अंक : जडण-घडण जून २०२१
राज्याभिषेक दिनानिमित्त
...
राजस्थानातील ‘सिसोदिया’ हा वंश प्राचीन काळातील विख्यात सूर्यवंशाशी रक्तवेलीचे नाते सांगणारा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याचा आद्यपुरुष ‘राणा देवराजजी’ हा सिसोदिया वंशातील होता. चितोड ही त्याची कर्मभूमी होती. कालौघात आलेल्या आक्रमणांच्या वावटळीत हे घराणे दक्षिणेकडे वळले. वेरूळला ठाण झाले. छ. शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे हे वेरूळच्या परिसरात लोकहितैषि कार्य करणारे म्हणून जनमान्यता पावले होते. या ‘सिसोदिया’ राजवंशात सोळाव्या शतकाची पहाट धरून शिवाजी महाराज या, घराण्याचे पांग फेडणार्या व या प्राचीन राष्ट्रपुरुषाच्या पायातील गुलामीच्या शृंखला फोडणार्या लोकोत्तर पुरुषाचा जन्म झाला. म्हणजेच शिवाजी महाराज हे पितृशाखेकडून सूर्यवंशाचे वारस होते. त्यांच्या अंगी सळसळते ‘सूर्यरक्त’ नांदत होते. या ‘सूर्यरक्ताच्या’ वारसदारांच्या हयातीत असंख्य मति गुंग करणारे प्रसंग गुदरून गेले. या प्रत्येक प्रसंगी महाराजांची एक विशिष्ट राजनीती व रणनीती प्रकट झाली आहे. ती राजनीती समजून घेणे हे अत्यंत बिकट काम आहे.
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Ashwini Gore
4 वर्षांपूर्वीअत्यंत वाचनीय लेख !!.....असा राजा होणे नाही
Dinesh subhash Chavan
4 वर्षांपूर्वीसर माननीय माझी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची सालाबाद प्रमाणे जयंती येत असून, त्या बाबतीत लेख द्या. विनंती 🙏🙏🙏
Dinesh subhash Chavan
4 वर्षांपूर्वीसर माननीय माझी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची सालाबाद प्रमाणे जयंती येत असून, त्या बाबतीत लेख द्या. विनंती 🙏🙏🙏
Vrunda Jadhav
4 वर्षांपूर्वीइतिहासात डोकावताना एक वेगळेच स्पुऱ्हाणं संचारले. जो कधीच माहित नव्हता असा इतिहास कळला
Diwakar Ganjare
4 वर्षांपूर्वीशिवाजी महाराज, एक उत्तुंग उंचीचा राष्ट्रपुरुष आपल्या मराठी मुलुखात होऊन गेला याचा सार्थ अभिमान वाटतोय. लेखक महोदयांच्या समर्थ लेखणीच कौतुक वाटतयं. धन्यवाद.
Hemant Marathe
4 वर्षांपूर्वीअतीशय स्फुर्तीदायक वर्णन