fbpx
☏ 91 5225 5235 | 9833 848 849

ललनांच्या लावण्याचे हानिलाभ

जिच्या कौमार्यांत लावण्याचा नेत्रानंददायी चंद्र आरोग्याच्या सफल कलानी प्रफुल्ल झालेला आहे; यौवनांत जिच्या उदरी देवदूतांसारखी सुंदर नी सुलक्षणी बालके जन्मली आहेत आणि त्यांना त्या आपल्या लावण्याचे नी शीलाचे ते वत्सल दूध पाजून संवर्धितांना जी स्वतः प्रतिपदेच्या चंद्रकोरीसारखी क्षीण कलांनीच पूर्ण कलांपेक्षांही प्रौढास्थेत सुमग भासत आहे; त्या जननीला आमचे शतवार वंदन असो!

पर्यायपीतम्य सुरिंहमांशोः।

कलाक्षयः श्लाघ्यतरी हि वृद्घेः।।

युरोपमध्ये सध्यां सौंदर्याची जिकडेतिकडे पूजा होत आहे पण पूर्वी एकदां याच युरोपमध्ये रोमन कॅथॉलिक पंथाचे वर्चस्व चालू असतां लावण्य हे ललनांच्या अंगचा, पुरुषांनी ज्यापासून अत्यंत सावध रहावे असा एक घातक दोष समजला जाई. त्या काळच्या युरोपीय धार्मिक वाङ्मयांत या घातक लावण्याची यथेच्छ निर्भत्सना केलेली आढळते. ख्रिश्चन धर्मांत जीजसच्या खालोखाल ज्यांचे शब्द धर्माज्ञेसमान पवित्र मानले जातात, त्या सेंट पॉल, सेंट पीटर प्रभूती आद्या महंतांच्या प्रत्यक्ष बायबलमध्येच ग्रंथिलेल्या उपदेशांतून स्त्री-स्वातंत्र्याची, स्त्री-मोहाची आणि एकंदर स्त्रीत्वाची कशी विटंबना केलेली आहे हे बायबलमधील खालील दोन उताऱ्यांवररून दिसून येईल-

“स्त्रियांनी चर्चमध्ये मौन धारण केले पाहिजे! कारण तिथे बोलण्याची त्यांना आज्ञा नाही. अज्ञान हाच त्यांचा मूळ स्वभावधर्म. त्यांतही जे शिकणे ते घरच्याघरी, आपल्या पतीकडूनच शिकले पाहिजे. कारण चर्चमध्ये बोलणे स्त्रियांना लज्जास्पद आहे !(Carinthians xiv, 34).”

‘पत्नीनों, आपल्या पतीलाच तुमच्या सर्वस्वाचा स्वामी माना! ख्राईस्ट जसा जगाचा प्रमुख धनी आहे, तसाच पती हाच पत्नीच्या नेता आहे; स्वामी आहे…आदमनंतर ईव्ह उपजली. (पुरुष वडील; स्त्री मूळचीच धाकटी) त्यांतही आदम (पहिला पुरुष) हा न फसतां ईव्हच (पहिली स्त्रीच) पहिल्याने फसली. अर्थात् स्त्रीच खरी अपराधिनी होय! (Timothy 11, 11-14).’

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

Leave a Reply

Close Menu