तात्या टोपे यांची अप्रसिद्ध आत्मकथा

पुनश्च    वि. श्री. जोशी    2019-05-24 10:00:28   

अंक- आलमगीर,  वर्ष- दिवाळी १९५७ १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाच्या प्रारंभाला गेल्या महिन्यातच शंभर वर्षे झाली. पण स्वतंत्र हिंदुस्थानात त्याची आठवण परसत्तेच्या नव्वद वर्षांच्या दडपणानंतरही ताजीच राहिली. त्या उत्थानात ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या तोंडचे पाणी सर्वात कोणी पळविले असेल तर सेनापती तात्या टोपे यांनीच. प्रचंड खटपटीनंतर ब्रिटिशांना हरविण्याचा त्यांचा प्रयत्न असफल झाला आणि त्या उत्थानाचे शेवटी १८ एप्रिल १८५९ ला शिप्री येथे तात्यांना फाशी देण्यात आले, तेव्हा ते एखाद्या मृत्युंजयी वीराप्रमाणे फाशी गेले. ‘‘हवा असल्यास तुमचा बचाव सिद्ध करा!’’ असे त्यांना काही इंग्रजांनी सुचवताच ते इतकेच म्हणाले, ‘‘मी जे जे केले ते करण्यात मी फक्त माझ्या धन्याचीच आज्ञा पाळली. काल्पीला येईपर्यंत मी नानांच्या आज्ञेखाली होतो आणि नंतर रावसाहेबांच्या. कोणत्याही युरोपियन पुरुषाच्या, स्त्रीच्या किंवा मुलाच्या वधाशी माझा काहीही संबंध नव्हता.’’ जगण्याची कोणतीही इच्छा न दाखवता ते शिक्षा ऐकल्यावर साखळदंडांनी जखडलेले हात उंचावत एवढेच म्हणाले, ‘‘फाशीच्या तख्तावरून किंवा वाफेच्या तोंडावरून, पण माझी या दु:स्थितीतून आणि बंधनांतून सुटक व्हावी इतकीच माझी इच्छा आहे!’’ ग्वाल्हेर येथील आपल्या कुटुंबियांचा आपल्या कोणत्याही अपराधात काही भाग नसल्यामुळे सरकारने त्यांना काहीही त्रास देऊ नये असेही ते म्हणाले. वरील दिवशी शिप्रीच्या किल्ल्याजवळ सायंकाळी त्यांची फाशी पाहण्यास शेकडो हिंदी आणि युरोपियन लोक जमले होते. तिसऱ्या बंगाली युरोपियन पलटणींच्या पहाऱ्यात साखळदंडांनी जखडलेल्या स्थितीत त्यांना वधस्तंभाकडे नेण्यात आले. ते स्वत:च त्याच्या पायऱ्या चढून गेले. त्यांचे हातपाय बांधण्यासाठी तेथील मां ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


इतिहास , दीर्घा , वि. श्री. जोशी

प्रतिक्रिया

  1. [email protected]

      5 वर्षांपूर्वी

    लेख खुपचं मोठा आहे .वाचायला स्टॅमिना लागतो .पण बरीच नवीन उद्बोधक माहिती वाचायला मिळाली .काही अपसमज दूर झाले. -सु.मा. कुलकर्णी, नांदेड

  2. Pratibha Jojare

      6 वर्षांपूर्वी

    तात्या टोपे क्रांतिकारी होते



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen