चला खानांच्या देशांत...

पुनश्च    स. पु. दाणी    2019-05-18 06:00:15   

विदर्भ, मराठवाडा, खानदेश या परिसराकडे पुणे, मुंबई, कोकणातली मंडळी दूरचा प्रदेश म्हणून पाहतात आणि मुंबईपासून दूर म्हणजे जणू सर्वांगीण विकासापासून दूर असलेला प्रदेश असावा असे समजतात. गेली अनेक वर्षे या दृष्टीकोनात फार फरक पडलेला नाही. प्रचंड तापमानात राहणारे लोक, पाण्याच्या टंचाईचा, दुष्काळाचा सामना करत जगणार लोक...एवढंच! प्रवास सुलभ झाल्यामुळे, येणं-जाणं वाढल्यामुळे अगदी साठ सत्तर वर्षांपूर्वी होते तसे गैरसमज आता राहिलेले नाहीत, परंतु समज मात्र आहेतच.  या समजाला छेद देऊ पाहणारा, खानदेशातील सौंदर्याचे, ऐतिहासिक वारशाचे वर्णन करणारा हा लेख मात्र तब्बल साठ वर्षांपूर्वीचा आहे. स्थळांची माहिती देणाऱ्या पुनश्र्चमधील मालिकेअंतर्गत हा लेख- जाऊन जायचं कुठं? तर आगीत आणि फुफाट्यांत. नांव मारे खा-न-दे-श, पण आहे काय तर तापलेली धूळ! पण वाचकहो लेख पुरा वाचा तर खरं आणि मग तुमचं मत काय होतं ते पहा. गाईच्या पावलांत सृष्टी मावावी तसं या छोट्या भूप्रदेशात एक वेगळं सुंदर जग तुम्हाला आढळेल. कोरीव लेणी, गरम झरे, हलते मनोरे, अप्रतिम शिल्पकला, नयनरम्य धबधबा, तलाव, तत्त्वज्ञान मंदिर, सोन्याची खाण, ऐतिहासिक पार्श्वभूमीचे पाठबळ असलेली, वस्तीने लहान पण कीर्तीने मोठी अशी गांवे; दूध, तूप, भाजी आणि फळफळावळ इत्यादींची समृद्धी आणि हे सर्व वैभव एकसमयाच्छेदे करून एखाद्या लहानशा भूप्रदेशांत पहावयाला सांपडले तर वास्तविक त्या प्रदेशाला नंदनवनच म्हणावयाला हवे! पण ते, मान्य नसले तरी निदान ह्या सुंदर वसुंधरेची छोटी प्रतिकृती म्हणून तरी तिचे कौतुक करावयाला काय हरकत आहे? मुंबई राज्यांतील पूर्व खानदेश जिल्हा हा वर उल्लेखिलेल्या वैशिष्ठ्यपूर्ण गोष्टींनी समृद्ध आहे आणि म्हणूनच जगाची छोटी प्रतिकृत ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


स्थललेख , पुनश्च , स. पु. दाणी

प्रतिक्रिया

  1. rsrajurkar

      6 वर्षांपूर्वी

    छान लेख . खानदेश पूर्ण लेखणाद्वारे अनुभवता आला . उत्तम माहिती . धन्यवाद .

  2. bookworm

      6 वर्षांपूर्वी

    सद्यस्थिती जाणून घेण्याचा मोह आवरत नाही. हेच या लेखाचे वाचनमूल्य आहे. अप्रतिम!

  3. gondyaaalare

      6 वर्षांपूर्वी

    छान माहिती पूर्ण पण थोडा बाळबोध वळणाचा लेख . खूप जुना असल्याने बरेच बदल झाले असतील .विशेषतः वाहतूकीच्या साधनात . MTDC सारख्या संस्थानी लक्ष घातल्यास पर्यटकांची सोय होईल

  4. ajitpatankar

      6 वर्षांपूर्वी

    खानदेशाची उत्तम सफर घडविली..१९६० सालातील इतके सविस्तर वर्णन वाचून सानंद आश्चर्य (pleasant surprise ला मराठीत काय म्हणतात?) वाटले.. यातील सर्व स्थळे मी गेल्या काही वर्षात पाहिली आहेत.. बाकी सोयी सुविधा वाढल्या आहेत पण अजूनही रस्ते ही समस्या आहेच..

  5. shripad

      6 वर्षांपूर्वी

    वा, छान! मी भुसावळकर असल्याने या लेखाच्या वाचनाने पुन्हा एकदा कान्हदेशात जाऊन आल्यासारखं वाटलं!



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen