fbpx

सावट आणि त्यावरचा उपाय

पुनश्च हा उपक्रम मराठी नियतकालिकांबद्दल आहे. फक्त आपण त्यात गेल्या दीडशे वर्षातली नियतकालिके आणि त्यातील लेख गृहीत धरतो. मग मनात आलं सध्याच्या मराठी नियतकालिकांतही काय काय वाचनीय आहे याचा एक मासिक लेखाजोखा घ्यावा. पत्रकार रविप्रकाश कुलकर्णी हे काम करायला आनंदाने तयार झाले. आता यापुढे दर महिन्याला आपण त्यांच्याकडून एक लेख पुनश्चसाठी खास लिहून घेणार आहोत. निरनिराळ्या मराठी नियतकालिकांतील लेखांबद्दल त्यात माहिती असेल.या मालिकेतील पहिला लेख…

—————————————————————————————————————————

प्रत्येक ऋतुचं काहीतरी कमी-जास्त असतंच. डावं-उडवं देखील असतं. पण उन्हाळ्याबाबत आपण जास्त तक्रार करत असतो.

“यंदा जरा जास्तच गरम होतय” असं आपण दरवर्षी म्हणत असतो. माणसाचा तो स्वभाव असतो. खरं तर सालाबादप्रमाणे म्हणावं असाच उन्हाळा असतो. तो सहन करण्याची सहनशीलता आपली कमी झालेली असते ही वस्तुस्थिती असते.

पण सालोसाल हेच घडत असतं.

ह्या उन्हाळ्याबरोबरच येते ती पाणीटंचाई आणि दुष्काळाचं सावट!

गेली कित्येक वर्षे आपण हेच घघेकत आलोय पण त्यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न किती होताना दिसतात? अर्थात कुणी प्रयत्नच करत नाही असा त्याचा अर्थ नाही. पण एकंदरीत पाण्याच्या प्रश्र्नाकडे आम्ही खरोखरच गांभिर्याने पहातच नाही. विदर्भ-मराठवाडा येथे आठ-आठ दिवस पाणी येत नाही आणि आम्ही पुणे-मुंबई येथे चुकून एखाद दिवस पाणी आलं नाही तर कोण आरडा ओरड करत असतो. ह्याचा अर्थ एकच आम्ही शेजारच्या दुःखाकडे संवेदनशीलपणे पहातच नाही असं म्हणावं काय?

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'पुनश्च' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'पुनश्च' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 2 Comments

  1. श्री कुलकर्णी आणि छान माहिती दिली. असेच निरनिराळ्या ठिकाणी ( सोशल मीडिया धरून ) निरनिराळ्या ठिकाणी आलेले लेख ,माहिती जरूर द्यावी यात राजकीय अभिनिवेश नसावा

  2. छान माहिती

Leave a Reply

Close Menu