हम बोलेगा तो....

पुनश्च    तंबी दुराई    2019-05-19 08:00:29   

‘प्रचार संपला. तुम्ही येणार का पत्रकार परिषदेला?’ ‘नको बा.’ ‘अहो चला ना, पाच वर्ष सगळे वाट बघताहेत. वाटल्यास आपण प्रश्न वाटून घेऊ, आणि आळीपाळीनं बोलू. एकाला तुम्ही उत्तर द्या, एकाला मी  देतो.’ ‘नको बा. मी दिसलो तर सगळे लोक मलाच प्रश्न विचारतील.’ ‘नाही हो, तसं नाही होणार. मी सांगतो ना त्यांना. आपलं ऐकतात ते लोक.’ ‘नको बा. असं समोरासमोर नको. स्टुडिओत बरं असतं. कागद असतात आपल्यासमोर, मध्ये ब्रेक घेता येतो. काही चुकीचं बोललं तर मागाहून एडिट करता येतं. मी नाही येणार पत्रकार परिषदेला. तू जा एकटाच.’ ‘पण मी म्हणतो, सारखं सारखं मीच का जायचं? कधीतरी तुम्ही पण जा ना.’ ‘नको बा. तूच जा. ‘अहो मला ते सारखे विचारतात, तुम्ही का येत नाही म्हणून. चला ना... ‘नको बा. मला खूप कामं आहेत.’ ‘दौरे तर संपले, आता काय काम आहे? आता २३ तारखेपर्यंत टाइमपासच करायचा आहे आपल्याला. चला,कशाला घाबरता तुम्ही?’ ‘मी? आणि घाबरतो?’ ‘मग, चला की.’ ‘नको बा.’ ‘काय हे नको बा नको बा लावलंय लहान मुलासारखं...बरं आधी आपण रिहर्सल करायची का? मी सगळी काळजी घेतली आहे. पत्रकार परिषदेला जास्तीत जास्त आपलीच माणसं येतील याचीही व्यवस्था करू आपण. त्यांना प्रश्नही आपणच दिलेले असतील आणि उत्तरे तर आपणच देणार आहोत. येता का?’ ‘नको बा. एखादा असला बाहेरचा घुसलेला आणि त्यानं काही उलट सुलट विचारलं तर?’ ‘मग द्यायची एक उलट...म्हणजे, आपणही उलट सुलट उत्तर द्यायची. हे काय मी तुम्हाला सांगायला पाहिजे?’ ‘तरी नकोच बा..’ ‘पण का? नकोच बा, का? मी तुम्हाला खात्री देतो, आपण पत्रकार परिषदेवर पूर्ण कंट्रोल ठेवू. तुम्हाला यादी देतो मी काय काय प्रश्न विचारले जाणार आहेत त्याची’. ‘अरे त्यांच्यावरच्या कंट्रोल ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


तंबी दुराई , अवांतर , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रिया

 1. rsrajurkar

    3 वर्षांपूर्वी

  मनातील कल्पना भन्नाट .?

 2. asmitaphadke

    3 वर्षांपूर्वी

  Mastch !! As useful !!!!

 3. NitinPardeshi

    3 वर्षांपूर्वी

  मस्तच

 4. Aaidada

    3 वर्षांपूर्वी

  खुप दिवसांनी आपलीच "मन की बात" वाचून मजा वाटली ??वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen