दूधवाला, कचरेवाला, पेपरवाला

पुनश्च    भानू काळे    2019-06-08 06:00:38   

'दूधवाला, कचरावाला आणि पेपरवाला हे मध्यमवर्गीयांच्या सकाळच्या दिनक्रमातले महत्वाचे परंतु 'फेसलेस' घटक आहेत. यांची आपण वाट पाहतो परंतु चेहरे क्वचितच पाहतो' या एका साध्याशा विचारावरुनही प्रतिभासंपन्न लेखक एखाद्या मोठ्या विषयापर्यंत जाऊ शकतो. संपादक, लेखक भानू काळे यांचा हा लेख याच प्रकारचा आहे. या तीन 'वाला'विषयी चिंतन करता करता ते चिंतकाच्याच भूमिकेत जातात आणि त्यातून एका मोठ्या विषयाला स्पर्श करतात आणि अखेर भाष्यकाराच्या भूमिकेत जातात.. कसे ते वाचा. ********** उर्वरित दिवसभरात कितीही कटकटींना सामोरे जावे लागले, तरी माझ्या दिवसाची सुरुवात मात्र तशी प्रसन्न असते. ही सुरुवात होते तीन ‘वालां’पासून - दूधवाला, कचरेवाला आणि पेपरवाला. प्रातर्विधी जेमतेम उरकत असतात, तेवढ्यातच हे तिघे दाराशी हजर होतात - साधारण पावणेसात-सातच्या दरम्यान. तसे ते खूपदा दृष्टीसही पडत नाहीत; आपले काम उरकून बाहेरच्या बाहेर गुपचूप निघून जातात. पण ते यायची मी आतुरतेने वाट बघत असतो. कारण ते येऊन गेल्यानंतरच माझा पहिला चहा होतो आणि उठल्याउठल्या पेपर वाचण्याचे आता जणू व्यसनच जडून गेले आहे. इतकी वर्षे मी बघतो आहे; हे ‘वाले’ कधीही खाडा करत नाहीत. इतर सर्वांप्रमाणे त्यांना हक्काची साप्ताहिक सुट्टीही नसते. परीक्षेचे दिवस असोत की मतदानाचे, आजारपण असो की घरगुती अडचणी, थंडी असो की पाऊस, दिवाळी असो की दसरा - हे येतातच. अर्थात एखाददुसरा अपवाद सोडून द्या. उदाहरणार्थ, अनंतचर्तुदशीनंतरच्या दिवशी पेपरवाला येत नाही; कारण आदल्या दिवशी वृत्तपत्रांना सुट्टी असल्याने नंतरच्या दिवशी पेपर नसतोच. पण यांतल्या एखाद्याचे असे न येणे हे अगदी अपवादस्वरूपच. त्यांच्याशी असलेल्या माझ्या जुजबी तोंडओळखीनुसार हे ‘वाले’ फारसे श ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


अंतर्नाद , चिंतन , भानू काळे , पुनश्च

प्रतिक्रिया

 1. ugaonkar

    2 वर्षांपूर्वी

  खूप चांगला लेख.

 2. ajitpatankar

    3 वर्षांपूर्वी

  भानू काळे यांचा लेख विचार करायला लावणारा आहे... लेखातील “कचरेवाला” यावरून “स्वच्छ भारत अभियान” मधील एक जाहिरात आठवली.. “मम्मी, कचरेवाला आया है” “बेटा, कचरेवाले तो हम है, वो सफाईवाला है”

 3. asmitaph

    3 वर्षांपूर्वी

  एकदम छान.

 4. jspalnitkar

    3 वर्षांपूर्वी

  भानू काळे ह्यांच्या लेखनाचं वेगळं कौतुक करायची गरजच पडू नये - कारण सूत्रबद्धता, नेमकेपणा आणि वेगळेपण ह्यांचं सातत्य त्यांच्या लिखाणात असतंच. वास्तववादी आशावाद हे त्यांच्या लिखाणाचं अजून एक वैशिष्ट्य! वाचकांना उत्तमोत्तम लेख उपलब्ध करून देणाऱ्या बहुविध चे आणि त्यांना असं लिखाण कमी पडू न देणाऱ्या काळ्यांसारख्या लेखकांचे आभार!!

 5. bookworm

    3 वर्षांपूर्वी

  आहे रे मनोवृत्तीचे सुंदर उदाहरण! अप्रतिम!!

 6. SubhashNaik

    3 वर्षांपूर्वी

  फारच सुंदर विचार प्रवर्तक लेख आहे. प्रत्येकाने आपले विहित कर्तव्य प्रामाणिकपणे व निष्ठेने केले पाहिजे, हा संदेश लेखकाने खुबीने दिला आहे. - सुभाष नाईक.वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen