सोळा आणे!

वि. स. उर्फ विष्णु सखाराम खांडेकर (११ जानेवारी १८९८ ते २ सप्टेंबर १९७६) यांची ओळख वाचकांना आहे ती मुख्यतः भावना, कर्तव्य, संस्कार, चांगले-वाईट यांच्या आवर्तनात सापडलेल्या भाबड्या व्यक्तिरेखा यांभोवती रचलेल्या कथा,कादंबऱ्या यांमुळे. ‘अमृतवेल’, ‘सोनेरी स्वप्नं’, ‘वेचलेली फुले’ अशा शीर्षकांमधूनही ते लक्षात येते. ‘ययाती’ ही कादंबरी हा त्यांच्या लोकप्रियतेचा कळस ठरला. खांडेकरांच्या लेखनातील विनोद मात्र या साहित्यामुळे झाकोळला गेला आमि झाकलेलाच राहिला. श्री.कृ. कोल्हटकरांनीही खांडेकरांचे काही लेख वाचल्यावर त्यांना अधिक विनोदी लेखन करण्याचा सल्ला दिला होता. प्रस्तुतचा लेख हा त्यांच्या विनोदी साहित्याचा आणि विनोदी प्रकृतीचा एक अप्रतिम मासला आहे. पोष्टाविषयी आजवर पुलंसह अनेक साहित्यिकांनी लिहिलेले आहे कारण एकेकाळी पोष्ट हा मध्यमवर्गीय भावविश्वाचा अत्यंत महत्वाचा कोपरा होता. खांडेकरांनीही या लेखाची सुरुवात पोष्टाच्या वर्णनानेच केली आहे, परंतु पुढे पुढे पोष्ट हे केवळ निमित्त म्हणून उरते आणि साहित्यिकांमधील बनचुकेपणावर ते फर्मास भाष्य करतात. म्हटलं तर ही कथा आहे आणि म्हटलं तर ललीत लेख. खांडेकर १९३८ पर्यंत शिरोड्याला होते तेंव्हा लिहिलेली ही कथा/लेख १९३४ साली ‘विश्ववाणी’च्या अंकात प्रसिदध झाली होती.

…………………..

एखाद्या पाश्चात्य कवीने पोस्टाची पर्वताशी तुलना केली आहे की काय ते मला ठाऊक नाही. असल्यास माझ्यावर वाङ्मयचौर्याचा आळ येईल. पण चोरीचा आळ येईल म्हणून गणेशचतुर्थीच्या सुन्दर चंद्रकोरीकडे न पाहून कवीचे कसे चालेल? म्हाताऱ्या आजीबाईंनी हवे तर त्या चंद्राकडे पाहू नये. पण लेखक शरीराने नसला तरी मनाने नेहमी तरुणच असतो असे सुप्रसिद्ध साहित्यसेवक दादा दोदवाडकर यांनी मागे आपल्या मुलाखतीत सांगितले आहे, नाही का? मग माझ्यासारख्या तरुण लेखकाने-म्हणजे दुप्पट तरुणाने-चोरीच्या आरोपाला भिऊन नवकल्पनेच्या चंद्रकोरीकडे पाठ फिरवायची? छेः! त्यापेक्षा लिहायला घेतलेली शाई तोंडाला फासावी, पेन्सिल करण्याकरीता जवळ ठेवलेला चाकू उरांत खुपसून घ्यावा अगर कुठल्यातरी प्रकाशकाच्या पुस्तकांच्या गुदामांत ‘सरस्वती, सरस्वती’ करीत काळ कंठावा!

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

This Post Has 6 Comments

 1. kaustubhtamhankar

  सारवट गाड्या फक्त इथेच पहायला मिळतात!- सारवट गाड्या म्हणजे काय? कृपया सांगावे….
  वि.स.खांडेकर कोल्हापुरात राजारामपूरीत रहात असत. त्यांच्या घरी त्या

  1. kaustubhtamhankar

   त्याना बघायचा आनंद मला मिळाला आहे.
   ययाती तिथे जन्मत होती.

 2. arush

  मस्त आहे

 3. Sunanda

  झकास! सात आण्यांचे रुपये हा वाक्प्रयोग रुळायला हरकत नाही.

Leave a Reply