बौद्ध धर्माचा विनाश भाग- २


अंक – पुरुषार्थ – मे १९५५ अशोकाच्या काळात बौद्ध सम्प्रदायाचा सार्वत्रिक प्रचार झाला असला तरी त्याच्या भावी विनाशाला कारणीभूत होणाऱ्या अंतर्गत मतभेदाच्या घुशी बौद्ध सम्प्रदायाच्या भव्य मंदिराला लागल्या होत्या व त्यामुळेच भावी काळांत अवाढव्य विस्तार पावलेला बौद्ध सम्प्रदाय ढासळून पडला. भगवान् शंकराचार्यांनी बौद्धधर्माचा नाश केला किंवा बौद्धांना भारताबाहेर पिटाळून लावले या सर्वसाधारण समाजात दृढमूल झालेल्या अपसमजाचे सप्रमाण निरसन केले आहे. पण पुढे प्रश्न असा उपस्थित होतो की भगवान् शंकराचार्यांच्या प्रयत्नांनी जर बौद्धधर्माचा लोप झाला नाही तर इतर कोणत्या कारणामुळे तो घडून आला? एका काळी अखिल भारतात व्यापलेल्या व अर्ध्या जगाने अंगीकारलेल्या बौद्धधर्माचा भारतातून सर्वतोपरी लोप होण्यास घडलेली कारणे फारच उद्बोधक असली पाहिजेत यात संशयच नाही. बौद्धधर्माच्या नाशाचे बीज कोठे होते व बीजाचे अंकुर हळू हळू कसे फोफावत गेले या प्रश्नाचे उत्तर मोठे मनोरंजक व आजच्या काळाला उद्बोधक असे आहे. बुद्धाच्या मृत्यूचा प्रसंग बौद्धधर्माच्या नाशाचे बीजारोपण भगवान् बुद्धाच्या मृत्युदिनीच झाले असे त्याच्या चारित्रावरून दिसून येते. भगवान् बुद्धाचा देहान्त झाला त्या दिवशीचा प्रसंग बौद्ध ग्रंथांतून विर्णिलेला आहे, तो असा – बुद्धाच्या मरणाने त्याचे सर्व शिष्य अत्यंत शोकाकुल झाले. पन्चभौतिक शरीर अनित्य, विनाशी आहे याची जाणीव असूनही बुद्धाचे पवित्र कलेवर एखाद्या विलक्षण प्रक्रियेने चिरस्थायी कसे काय ठेवता येईल याचा विचार बुद्धाचे अन्तेवासी करू लागले. निरनिराळ्या प्रक्रियांच्या साहाय्याने जास्तीत जास्त सात दिवसपर्यंत बुद्धाचे प्रेत तसेच सुरक्षित ठेवण्यात आले ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


इतिहास , पुरुषार्थ , दीर्घा

प्रतिक्रिया

  1. [email protected]

      4 वर्षांपूर्वी

    बुध्द आणि महावीर या दोघांनीही , श्रमण परंपरा पुढे चालू ठेऊन , हिंदू धर्मातील तत्वज्ञान रुढी परंपरा नाकारून एक विज्ञानवादी विचार मांडला. महावीर यांनी देव हा मूर्ती पूजेच्या रुपात पूजायला परवानगी दिली , परंतु महा वीरांचे देव हे सृष्टी निर्माण करणारे नाही आहेत , ती पराक्रमी माणसं आहेत, त्यांची पूजा त्यांच्या सारखी विरता प्राप्त करून घेण्यासाठी करायची असा संदेश दिला ... थोडक्यात जैन तत्वज्ञान नास्तिक असूनही हिंदू धर्माच्या कर्म कांडा जवळ जाते... गौतम बद्धांनी मात्र हे सर्व नाकारले आणि त्यामुळे विद्वान हिंदू विचारवंत बुध्द धर्माचे भारतातून अस्तित्व नामशेष झाले या विषयावर भरपूर लिहितात. परंतु एकाच काळातील असून महावीर यांचा धर्म, जो बुध्द यांच्या धर्मा पेक्षा टोकाची बंधने घालणारा असूनही, बहुसंख्यांक लोकांनी स्वीकारला नाही याचे स्पष्टीकरण देणारं लिहीत नाहीत ...( इंग्रजी लोकांनी यावर असं म्हंटले आहे की हा धर्म त्याकाळातील सधन, व्यापारी लोकांनी हिंदू धर्मातील ब्राम्हणी वर्चस्वाला कंटाळून स्वीकारला.) बुध्द धर्माने योग , ध्यानधारणा यावर केलेले काम आज जगाला मार्ग दाखवत आहे, हे निश्चित.

  2. ugaonkar

      5 वर्षांपूर्वी

    विश्वास ठेवण्यास कठीण !



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen