" ब्रो , वेक अप , यु नीड टू सी दीस . पाणी अगदी दारापर्यंत आलंय . काही वेळात आतमध्ये येईल . " सकाळी आठच्या सुमारास रवीने उठवले .रात्रभर केलेल्या धावपळीमुळे आधीच अंगात त्राण उरले नव्हते . सकाळी साडेचारला डोळा लागला होता . त्यामुळे नाराजीनेच डोळे किलकिले करून त्याच्याकडे पाहिलं . त्याचा चेहरा चिंतातुर दिसत होता . वरच्या बर्थवरून खाली उतरलो आणि दारापाशी जाऊन बाजूला काय चाललंय ते पाहू लागलो . रविवारी हॉटेल सयाजी कोल्हापूरला अनिशचा साखरपुडा होता. शनिवार, रविवार सगळ्यांना सुट्टी असल्याने आम्ही मित्रांनी शुक्रवारी रात्रीच निघायचं ठरवलं होतं. शनिवारी मस्तपैकी तिथल्या एका मित्राची गाडी घेऊन एक दिवस कॉलेजला , होस्टेलला जायचं , जे जे जुने अड्डे होते तिकडे जाऊन जुन्या आठवणींची उजळणी करायची, हुंदडायचं असा बेत होता . ठरल्याप्रमाणे शुक्रवारी संध्याकाळी ऑफिसमधून तासभर लवकर निघालो . पॅकिंग केलं . एव्हाना पावसाची रिपरिप चालू झाली होती . रिक्षासाठी मारामार होती , कशीबशी रिक्षा पकडून मुलुंड स्टेशन गाठलं . मध्येच ट्राफिक लागल्याने रिक्षा वाटेत सोडून चालत आलो . तोवर वाऱ्यापावसामुळे कंबरेखाली चिंब भिजलो होतो . स्टेशनला येऊन पाहतो तर काय , प्लॅटफॉर्मवर माणसांचा पूर आला होता . पण एकच स्टेशन जायचं असल्याने धक्काबुक्की करत कसाबसा घुसलो . दरवाज्याजवळच उभा असल्याने एक बाजू एव्हाना पूर्ण भिजली होती. शुद्धोदक स्नानम समर्पयामि म्हणत ठाणे स्टेशन गाठलं. पावसाला दोन चार शिव्या हासडत स्टेशनवर तसवीरला हुडकलं. एव्हाना रवी , दुबे आणि गुज्जू दादरहून महालक्ष्मीने निघाले होते . ठाण्याला नऊची वेळ होती . मात्र गाडी अर्धा तास लेट झाली . मागाहून निघणाऱ्या चेन्नई एक्सप्रेसला पुढे सोडण्यात आलं होतं . झाल ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
rambhide
6 वर्षांपूर्वीदोनच किमीवर स्टेशन होते तर गाडी हळू हळू चालवीत का आणली नाही असा प्रश्ण अनेकांना पडला असेल. अशा पावसात व वाहत्या पाण्यात रुळांखालची खडी पूर्णपणे वाहून गेलेली असू शकते व नुसतेच रूळ स्लिपरसह हवेत लटकत असू शकतात. या कारणास्तव पायाखालची जमीन सरकेल असा निर्णय घेत नाहीत.
amarsukruta
6 वर्षांपूर्वीछान
ShaileshN
6 वर्षांपूर्वीखरोखरीचं वातावरण उभे केलेत. परवा टेलिव्हिजनवर दाखवण्यात आलं त्यापेक्षा खूपच वेगळं होते हे वास्तव. - शैलेश पुरोहित