नेहरूंनी केली नाणेफेक मोदींनी मारली सिक्सर!


काश्मीर प्रश्नावर फेसबुकाच्या ह्या भिंतींवर अनेकवार लिहून झाले आहे. तरी प्रसंग झाला की तेच तेच पुन्हा पुन्हा लिहावे लागते, तसेच आजचे. काल मोदीशहांनी जे केले ते नेहरूंच्या धोरणाशीच नव्हे तर कार्यपद्धतीशी देखील सुसंगत होते. कसे ते पाहा. भारत स्वतंत्र व्हायची वेळ आली तेव्हा कुणालाही स्वतंत्र राहण्याची मुभा देण्यात आली नव्हती. भौगोलिक सलगता आणि धार्मिक बहुसंख्या हे विभाजनाचे सूत्र होते. हे सूत्र जे विसरतात ते भावनेच्या आहारी जातात. भावनेच्या आहारी गेलेल्याची न्यायबुद्धी मग जागेवर राहात नाही. अगदी नेहरूंची न्यायबुद्धीसुद्धा आपल्या प्रांतप्रेमामुळे एका नाजूक क्षणी अतिशय अशक्त झाली. काश्मीर भौगोलिकदृष्ट्या पाकिस्तानला सलग होता आणि तेथे मुस्लीम बहुसंख्या होती. हा प्रांत पाकिस्तानात जाणार अशीच हिंदुंची अटकळ होती. असे नसते तर १५ आॅगस्ट १९४७ रोजी काश्मीर अधांतरी नसता. त्या दिवशी काश्मीरशिवायच हे दोन देश जन्माला आले. तीन देश निर्माण करण्याचा कोणताही विचार जिना, काँग्रेस आणि मुख्य म्हणजे ब्रिटिशांच्या मनात नव्हता.********** [caption id="attachment_12662" align="alignright" width="300"] राजा हरिसिंग आणि वल्लभभाई पटेल[/caption] काश्मीर प्रश्न निर्माण होण्याचे पहिले कारण शेख अब्दुल्ला हे होय. काश्मीरचा राजा हरिसिंग होता. त्याला वल्लभभाई किंवा जिना सहज गुंडाळू शकले असते. पण शेख अब्दुल्ला ह्यांनी तोवर १५ वर्षे काश्मीरच्या बहुसंख्य मुस्लीम जनतेला स्वतंत्र राष्ट्राच्या कल्पनेने केवळ भारूनच टा ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


राजकारण , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रिया

  1. [email protected]

      4 वर्षांपूर्वी

    नेहरु पंतप्रधान होते म्हणून काश्मिर प्रश्न राहिला वल्ल्भभाई पटेल पंतप्रधान असते तर कायमचा निकाल लावला असता हा लेख अर्धंवट असल्याचे वाटत आहे.

  2. Santosh Jadhav

      4 वर्षांपूर्वी

    सगळ्याच इतिहास पुरुषांचा/महिलांचा उल्लेख सगळ्याच लेखकांनी एकेरीच केलेला आहे.लेखनातही काळानुरूप बदल होत असतात.कदाचित इथून पुढे त्यांच्या त्यांच्या अनुयायांच्या दबावामुळे आदरार्थी संबोधन व्हायला लागेल.

  3. [email protected]

      4 वर्षांपूर्वी

    मणेरीकर आम्हा लोकांसारखेच सुरक्षित महाराष्ट्रीयन ,दुरून दुरून वाचून तज्ञ् ! त्यांचे विचार वाचून करमणूक झाली त्यामुळे गांभीर्याने पाहावे असे त्यात काही नाही !!

  4. scd9265

      5 वर्षांपूर्वी

    लेख संतुलीत नाही.

  5. Rajendra Manerikar

      5 वर्षांपूर्वी

    हरिसिंगाला आदरार्थी संबोधायला माझी काही हरकत नाही. पण तो आणि निजाम दोघांबद्दल मला तसे जमले पाहिजे. आपण निजामाबद्दल थोडे आदरार्थी लिखाण करून दाखविलेत तर मी तसा सराव करून मग हरिसिंगांना रडू फुटले असे लिहीन.

  6. Rajendra Manerikar

      5 वर्षांपूर्वी

    नेहरूंनी न्याय केला नाही असे प्रतिपादन येथे सकारण केले त्याला चूक म्हटल्यास पुढे बोलता येईल.

  7. Rajendra Manerikar

      5 वर्षांपूर्वी

    काश्मीर अधांतरी होता ह्याचा अर्थ इतकाच की तो भारतात नव्हता आणि पाकिस्तानातही नव्हता. हे दोन देश कोणत्याही संस्थानाला स्वतंत्र राहू देणार नव्हते पण काहींनी तसा प्रयत्न केला तो यशस्वी झाला नाही, होणारच नव्हता.

  8. सुधन्वा कुलकर्णी

      5 वर्षांपूर्वी

    एकेरी संबोधन आणि आदरार्थी संबोधन याबद्दलचे मराठी वाचकांचे मापदंड अनाकलनीय आहेत. राम-कृष्ण यांच्यापासून अशोक-चंद्रगुप्त आणि बाबरापासून बहादूरशहा जफर यांच्यापर्यंत सर्व राजांना तो एकेरी संबोधतो आणि लेखांतही एकेरी उल्लेख करतो. शेक्सपियर पासून बराक ओबामा आणि न्यूटन पासून आईनस्टाईन पर्यंत सर्व परदेशी थोरांचा उल्लेख तो एकेरीनेच करतो. पण कोणा राजा हरीसिंगाचा उल्लेख एखाद्याने एकेरीत केला तर त्याच्या भावना दुखावतात. पूर्वप्रसिद्ध लेख आपण घेत असल्याने शक्यतो संपादन करत नाही. सोशल मिडीयावरील ललितलेख आणि त्यातली भाषा सर्वच वाचकांना पसंत पडेल असे नव्हे. पण तरीही तुमचे आक्षेप लेखकाच्या कानावर घालून त्यांचे मत यावर मांडू.

  9. सुधन्वा कुलकर्णी

      5 वर्षांपूर्वी

    'निवडक' ही बहुविध.कॉम वरील निःशुल्क कॅटेगरी आहे. या कॅटेगरीमध्ये सोशल मिडीयात ( फेसबुक, whatsapp, ब्लॉग्स, डिजिटल वर्तमानपत्रे ) प्रसिद्ध झालेले काही निवडक लेख पुनर्प्रकाशित केले जातात. या लेखांचे विषय नानाविध असतात. आपण सर्व लेखांवर नजर टाकली तर ते लक्षात येईल. सध्याच्या गदारोळात काश्मीर वरील हा लेख आम्हाला उल्लेखनीय वाटला आणि म्हणून त्याची निवड केली. या प्रश्नावरचा अजून एक दृष्टीकोन, म्हणून वाचकांनी तो वाचावा अशी यामागची कल्पना आहे. बाकी लेखांवर मतमतांतरे असणारच, आणि असलीही पाहिजेत. सदर लेखक तुमच्या आक्षेपांना उत्तरे देतील अशी आशा बाळगू.

  10. VijayGokhale

      5 वर्षांपूर्वी

    काश्मीर भौगोलिकदृष्ट्या पाकिस्तानला सलग होता आणि तेथे मुस्लीम बहुसंख्या होती. हा प्रांत पाकिस्तानात जाणार अशीच हिंदुंची अटकळ होती. असे नसते तर १५ आॅगस्ट १९४७ रोजी काश्मीर अधांतरी नसता. No substantiation in the article. हा भारताच्या आणि नेहरूंच्या न्यायबुद्धीचा कस लागण्याचा क्षण होता. हा मोहाचा क्षण नेहरूंना टाळता असता तर उभय राष्ट्रांचे भले झाले असते. ????? What is sought to be communicated? जर त्याचवेळी नेहरूंनी जम्मू लडाख आमचे, काश्मीर पाकिस्तानचा असा न्याय केला असता तर आज भारतीयांना काश्मीरबद्दल जी आपुलकी वाटते ती वाटलीच नसती आणि भारताने आपले नंदनवन चोरले अशी भावना पाकिस्तानात निर्माण होऊन त्यांच्या अफाट द्वेषाचे आपण कारण झालो नसतो. असा न्याय केला असता तर ????? No a very mature writing.. on what parameters it was selected to be published? Who selected it?

  11. Aniruddhak72

      5 वर्षांपूर्वी

    लेख लिहीतांना भाषा व्यवस्थित असावी . हरिसिंगांच्या बाबतीत आदरार्थी भाषा आवश्यक होती .आला , गेला , पाया पडला , रडलाही भाषा नव्हे. काही झाले तरी ते एक संस्थानिक होते. लेखक इतरांच्या बाबतीत ही भाषा वापरू शकेल. बर , हा नवीन लेख आहे . अशा लेखांचे संपादन होणे आवश्यक आहे



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen