निवडक अग्रलेख - दिनांक १५ ऑगस्ट २०१९ प्रहारचा अग्रलेख पारंपारिक स्वातंत्रदिन स्पेशल आहे. फक्त एकच त्यात उल्लेखनीय म्हणजे महाराष्ट्र हे महात्मा गांधी, शाहू, फुले, आंबेडकर, रानडे यांचं पुरोगामी राज्य असं म्हटलंय. आता गांधी महाराष्ट्राचे कसे हे उमगत नाही आणि रानडे यांचा उल्लेख फारच आश्चर्यकारक. सकाळचा अग्रलेख पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची महापुराने झालेली दुर्दशा आणि सरकारकडून अपेक्षा यांचे वर्णन करतोय. सरन्यायाधीशांनी यंत्रणावर नोंदवलेली निरीक्षणे आणि ताशेरे यांच्यावर भाष्य करणारा लोकसत्ताचा अग्रलेख गोल गोल विषय मांडून हातात फारसं काही देत नाही. सामनाचा अग्रलेख टिपिकल स्वातंत्र्यदिन, काश्मीर, ३७०, हिंदुत्ववाद वगैरे वगैरे वळणाचा आहे. मुंबई तरुण भारत चा अग्रलेख सुद्धा स्वातंत्रदिनाच्या निमित्ताने स्वाभाविकपणे सरकारचे अभिनंदन कौतुक वगैरे असाच आहे. किरण ठाकूरांच्या बेळगाव तरुण भारतचा अग्रलेखही साधारण त्याच अंगाने जातोय, पण पाकिस्तानला खास झोडून काढणारा आहे. लोकमतचा अग्रलेख स्वातंत्र्यदिनाचा जनरल आढावा घेणारा.. पण याच विषयाला वाहिलेला असूनही मांडणीच्या दृष्टीने संतुलित आणि वाचनीय असलेला अग्रलेख आज महाराष्ट्र टाईम्समध्ये वाचायला मिळाला. त्यामुळे आजच्या निवडक साठी त्याची निवड केली आहे. खालच्या लिंकवर क्लिक करून हा लेख वाचता येईल. https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/challenges-ahead-of-independ ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .