सैन्यदलांमध्ये समन्वय – दै. पुढारी

निवडक अग्रलेख – १७ ऑगस्ट २०१९

नावात साम्य असलं तरी बेळगाव तरुण भारत हा अजिबात संघ परिवाराचा भाग नाही. किरण ठाकूरांचा तरुण भारत मुख्यत्वे बेळगावात मराठीचा झेंडा उचलून धरणारा आणि सीमाप्रश्नावर आक्रमक असलेला पेपर आहे. पण आजचा पंतप्रधानांच्या भाषणावरचा अग्रलेख वाचताना नागपूर तरुण भारत वाचतोय की काय असा भास झाला. :)

मग नागपूर तरुण भारत तर संघाचं मुखपत्रच समजलं जातं. त्यामुळे त्यांचा अग्रलेख मोदी स्तुतीने भरलेला असल्यास त्यात नवल ते काय ?

मटाचा अग्रलेखही सीडीएस, म्हणजे तीनही सैन्यदलांचा मिळून एक सर्वोच्च अधिकारी नेमणे, या विषयावर असून त्याची तीव्र आवश्यकता आणि निर्णयाचे स्वागत करणारा आहे.

दिव्य मराठीचा ४०० शब्दांचा अग्रलेख चक्कं ‘सेक्रेड गेम्स’ या अनुराग कश्यप च्या वेब सिरीज वर आधारलेला आहे. या सिरीजचे संवादांसह वर्णन आणि विश्लेषण त्यात केलं आहे. सध्याच्या राजकारणाशी जोडलेले सिरीजचे संदर्भ वाचून अक्षरशः हसू येतं. त्यामुळे तो अग्रलेखापेक्षाही, एखाद्या पत्रकाराची फेसबुक पोस्ट अधिक वाटतो. पण असो.

लोकमत – काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राहुल गांधींना काश्मीर भेटीसाठी दिलेले आमंत्रण; या भेटीमुळे होवू शकणारे सकारात्मक परिणाम हा एक भाग. आणि राजस्थानमधून मनमोहन सिंग हे राज्यसभेत पुन्हा निवडून जात आहेत; सध्याच्या आर्थिक तणावांच्या काळात सिंग संसदेत पुन्हा येण्याचे महत्व कसे असेल, हा दुसरा भाग अग्रलेखात विषद केला आहे. या दोन महत्वाच्या घटनांचे स्वागत करणारा लोकमतचा अग्रलेख सुंदर जमला आहे.

तिहेरी तलाक बंदी, ३७० चे उच्चाटन, लोकसंख्या वाढीवर नियंत्रण करण्यासाठी मोदींनी केलेले आवाहन, हा प्रवास समान नागरी कायद्याच्या दिशेने कसा जातोय, व त्याचे स्वागत कसे आवश्यक आहे, हे सांगणारा सामना चा अग्रलेख नेहमीच्या शैलीत लिहिला आहे.

३७० हटवण्यावरून पाकिस्तान आणि इम्रानखान यांनी चालवलेल्या निष्फळ थयथयाटाचे वर्णन करणारा प्रहार चा अग्रलेख ठाकठीक आहे. मोदींच्या भाषणावर आधारलेला सकाळ चा आजचा अग्रलेखही ठाकठीकच.

सांगलीचे नगर वाचनालय परवा पाण्याखाली जाऊन तेथील ९० हजार पुस्तकांचा लगदा झाला. अशी गावोगावची १०० वर्षांहून जुनी वाचनालये, त्याच्याकडे असलेली ग्रंथसंपदा, तिची जोपासना, सामाजिक व सरकारी उदासीनता, डिजिटायझेशनची गरज, इत्यादी चा सांगोपांग उहापोह करणारा लोकसत्ताचा अग्रलेख लौकिकाला साजेसा जमला आहे.

सीडीएस, ही मोदींच्या परवाच्या भाषणातली मोठी घोषणा. त्या अनुषंगाने, या पदाची गरज, त्याचा इतिहास, त्याला हवाईदलाकडून पूर्वी झालेला विरोध, या संदर्भात अतिशय माहितीपूर्ण अग्रलेख आज वाचायला मिळाला. ही जुनी माहिती, आवश्यक तपशीलासह, योग्य वेळी वाचकांसमोर ठेवणे महत्वाचे. म्हणून आजचा निवडक अग्रलेख पुढारीचा. :)

खालील लिंकवर क्लिक करून हा अग्रलेख वाचता येईल.

https://www.pudhari.news/editorial/editorial/pudhari-editorial-chief-of-defence-staff-and-Coordination-among-military-forces/

दैनिक पुढारी, संपादक- विवेक गिरधारी

**********

सदर अग्रलेखाबद्दल आपली प्रतिक्रिया द्या. आणि ही पोस्ट आवडल्यास नक्की शेअर करा. जेणेकरून अधिकाधिक वाचक याचा आस्वाद घेऊ शकतील. तसेच हा उपक्रम कसा वाटतोय, हे आम्हाला जरूर कळवत जा. आपल्या सूचना, तक्रारी, आक्षेप नोंदवत राहा. उपरोल्लेखित मराठी वृत्तपत्रांखेरीज अन्य आपल्याला सुचवायची असतील, त्यातील अग्रलेख आपल्याला आवडत असतील तर तेही कळवा. त्यांचा समावेश या सदरात करून घ्यायला आम्हाला नक्की आवडेल.

सुधन्वा कुलकर्णी

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

This Post Has 2 Comments

 1. MaheshKhare

  चांगला अग्रलेख आणि अग्रलेखांचा परिचय करून देण्याचा चांगला उपक्रम ! इतर अग्रलेखांच्याही लिंक्स मिळतील का ?

  1. सुधन्वा कुलकर्णी

   प्रतिक्रियेसाठी धन्यवाद… महेश खरे :)

   इतर अग्रलेखांच्या लिंक नक्की देता येतील. पण त्यात ‘आजचा निवडक अग्रलेख ‘ हे विशेष शिल्लक रहात नाही. म्हणून केवळ त्या त्या अग्रलेखाची लिंक आपण देत असतो. अर्थात वाचकांची अधिक मागणी असल्यास त्याही देऊ.

Leave a Reply