निवडक अग्रलेख - १९ ऑगस्ट २०१९ लोकसत्ता- महाराष्ट्र सरकारच्या बिल्डर्सना चटई शुल्कात कपात करण्याचा निर्णय कसा धाडसी आणि आवश्यक आहे याचे वर्णन करणारा अग्रलेख फडणवीसांचे कौतुक करतोय. मात्र याचा फायदा अंतिम ग्राहकाला मिळण्याची खबरदारी त्यांनी घ्यावी असेही बजावतोय. हॉंगकॉंग मध्ये चीनच्या केंद्रीय सत्तेविरूद्ध तेथील जनतेचे तीव्र आंदोलन चालू आहे. त्याचा आणि एकंदर चीनी दडपशाहीचा आढावा घेणारा लोकमतचा अग्रलेख चांगला आहे. 'डोवाल मंत्र' हा पुढारीचा आजचा अग्रलेख. ३७०च्या उच्चाटनामुळे पाकिस्तानची झालेली कोंडी, त्याच्या परराष्ट्र मंत्र्यांना झालेला डोवाल मंत्राचा साक्षात्कार, अजित डोवालांनी काश्मीरमध्ये केलेली आगाऊ तयारी, या सर्व गोष्टींचा उहापोह करणारा हा लेख उत्तम आहे. भारताच्या परराष्ट्रीय धोरणात ( कृतीत ) पडलेला फरक यात अधोरेखित होतो. जलप्रलय आणि रस्ते सुरक्षा या विषयावरचा नागपूर तरुण भारतचा अग्रलेख कंटाळवाणा. एनडीआरएफ आणि नाविक दलाचे त्यांनी केलेले कौतुक मात्र योग्य. हाताशी फक्त चार पाच वाक्यांचा मजकूर असताना जर त्यातून ८०० शब्दांचा अग्रलेख सजवायचा असेल तर तेच तेच मुद्दे वाक्यरचना बदलून लिहावे लागतात. प्रहारचा ' वंचित’कडून काँग्रेसला ‘ब्लॅकमेलिंग’! हा लेख याचाच नमुना आहे. नुसता गोलगोल फिरतोय हा अग्रलेख. आज खय्यामला श्रद्धांजली वाहणारा मटा चा अग्रलेख उत्कृष्ट. सिनेसंगीत आणि स्वतः खय्याम हे दोन्ही जिव्हाळ्याचे विषय असल्यानेच मला हा अग्रलेख विशेष भावला यात वाद नाही. दिव्य मराठीचा लघु-अग्रलेख मुळात ४०० शब्दांचा. त्यातही निम्मे शब्द खय ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
सुधन्वा कुलकर्णी
6 वर्षांपूर्वीसामनाच्या लिंकचं सेटिंग निराळं असल्याने ती app मधून ओपन होत नाहीये.पुढच्या वेळी दुरुस्त करू. तूर्तास या लिंकवर क्लिक करून उघडतंय का ते बघा. https://bit.ly/2PfqPTJ
arush
6 वर्षांपूर्वीलिंक open होत नाहिये