निवडणुकांचे निकाल लागले आणि पाठोपाठ दिवाळी सुरु झाली. त्यामुळे गेला आठवडा निकालांचे कवित्व आणि दिवाळीचा फराळ दोन्ही एकत्रच सुरु होते. अर्थात १० दिवस उलटून जाऊनही महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा पेच काही अद्याप सुटलेला दिसत नाहीये. किंवा सर्वोच्च पातळीवर ' आमचं ठरलंय ' असलं तरी अजून ते जाहीर करण्याचा मुहूर्त आलेला नाही, असं म्हणूयात. त्यामुळे गेल्या आठवड्यात प्रामुख्याने हेच विषय अग्रलेखांतून हाताळले गेले असले तरी दिवाळी, फटाक्यांचे प्रदूषण, व्हॉट्सअपची पाळत आणि हेरगिरी, ओला दुष्काळ, इत्यादी विषयही जोडीने चघळले गेले. मात्र आश्चर्यकारकरीत्या, सर्वाधिक दखल घेतली गेलेली बातमी आंतरराष्ट्रीय होती. आयसीस संघटनेचा म्होरक्या बगदादी याचा अमेरिकेने केलेला खात्मा आणि त्यामागील विश्लेषण तब्बल सात अग्रलेखांतून केले गेले. पाहूया कोण काय म्हणतंय... ********** अल् बगदादीला कुत्र्याच्या मौतीने मारले, अशी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाड ट्रम्प यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया, या व्यक्तीविषयी अमेरिकेच्या मनात किती चीड होती, हे दाखवून देणारी आहे. त्याला ठार मारल्याच्या घटनेचे, अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात असलेल्या डेमोक्रेटिक पक्षाच्या नेत्यांनीही खुल्या दिलाने स्वागत केले आहे. कुणीही ट्रम्प यांच्या या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही. ते ट्रम्पविरोधी असले तरी त्यांनी या राष्ट्रीय मुद्याशी त्या विरोधाचा संबंध जोडला नाही. भलेही ते ट्रम्प यांचा तिरस्कार करीत असले, तरी त्यांनी त्या तिरस्काराचा लवलेशही राष्ट्रीय मुद्याला समर्थन देण्याच्या प्रसंगी जाणवू दिला नाही. कारण त्यांचे अमेरिकेवर, आपल्या देशावर नितांत प्रेम असून, ते अमेरिकेचा शत्रू असलेल्या प्रत्येकाला आपला वैयक्तिक ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .