'कवी बा. भ. बोरकरांच्या कवितेतले 'देखणे'पण आपल्या सर्वांना मिळो' या शुभेच्छा !! देखणे ते चेहरे, जे प्रांजळाचे आरसे । गोरटे की सावळे, या मोल नाही फारसे ॥ तेच डोळे देखणे, जे कोंडीती सार्या नभा । वोळिती दुःखे जनांच्या, सांडिती नेत्रप्रभा ॥ देखणे ते ओठ की जे ओविती मुक्ताफळे। आणि ज्यांच्या लाघवाने, सत्य होते कोवळे ॥ देखणे ते हात ज्यांना, निर्मितीचे डोहळे । मंगलाने गंधलेले, सुंदराचे सोहळे ॥ देखणी ती पाऊले, जी ध्यासपंथे चालती । वाळवंटातूनसुद्धा, स्वस्तिपद्मे रेखिती ॥ देखणे ते स्कंध ज्या ये, सूळ नेता स्वेच्छया । लाभला आदेश प्राणां, निश्चये पाळावया ॥ देखणी ती जीवने, जी तृप्तीची तीर्थोदके । चांदणे ज्यातुन वाहे, शुभ्र पार्यासारखे ॥ देखणा देहान्त तो, जो सागरी सुर्यास्तसा । अग्निचा पेरुन जातो, रात्रगर्भी वारसा ॥ ********** कवी -बा. भ. बोरकर Google Key Words- मराठी कविता, बाळकृष्ण भगवंत बोरकर, बाकीबाब, Marathi Kavita, Kavita, Ba.Bha. Borkar, Marathi Poet. ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Ashwini Gore
4 वर्षांपूर्वीकिती उदात्त विचार !! 👌
Mukund Deshpande
4 वर्षांपूर्वीखरे देखणेपणाचे नेमके सार,
Medha Vaidya
4 वर्षांपूर्वीसोप्या नेमक्या शब्दात देखणेपणा ची नवी दृष्टी देणारी अप्रतिम कविता
bookworm
7 वर्षांपूर्वीसुंदर, अप्रतिम काव्य!
मोहिनी पिटके
7 वर्षांपूर्वीबोरकर देखणेपणाचा नवा अर्थ सहजपणे उलगडून दाखवतात तेच डोळे देखणे जे आकाशव्यापी दु: खाला कवेत घेतात . हे देखणेपण खरे श्रेयस आहे .
Varsha Vipra
7 वर्षांपूर्वीApratim
अमर पेठे
8 वर्षांपूर्वीदेखणेपणा म्हणजे दिसायला सुंदर असाच समज होता, ह्या कवितेने वेगवेगळ्या प्रकारे देखणेपण पाहता आले फार मस्त
M.R.PANDAO
8 वर्षांपूर्वीvery nice
M.R.PANDAO
8 वर्षांपूर्वीsundar
neelampra
8 वर्षांपूर्वीबाकीबांचे हे काव्य आणि संत ज्ञानेश्वरांचे पसायदान हे कुठेतरी मिळते जुळते आहे असेच वाटते !! प्रदीप जोशी
milindvh
8 वर्षांपूर्वीअसे सर्वांगी देखणेपण प्राप्त होणे जाऊदे, किमान ते समजणारी नजर मिळाली तरी भरुन पावलो असं वाटेल.
Aparna Abhijit Apte
8 वर्षांपूर्वीsundar
mugdha bhide
8 वर्षांपूर्वीapratim ……. kalpanashaktila salam