गोंडांच्या लिंगो देवाची विलक्षण कहाणी

पुनश्च    दुर्गा भागवत    2020-04-18 06:00:03   

अंक : गावकरी, दिवाळी १९५१ कथेबाबत थोडेसे: मराठीतील ज्येष्ठ विदुषी दुर्गा भागवत यांनी इंग्रजीतून मराठीत अनुवादित केलेली प्रस्तुतची कथा जेवढी सुरम्य आहे तेवढाच त्या कथेचा इतिहास आणि त्या इतिहासामागे दडलेल्या रेव्हरंड स्टिफन हिस्लॉप यांची कथाही सुरम्य आणि सुरस आहे. रेव्हरंड स्टिफन हिस्लॉप हा मूळचा स्कॉटलंडमधील शिक्षणतज्ञ आणि धर्मप्रसारक. त्याला ज्ञानप्राप्तीची अपार हौस होती. १८४४ साली त्याला धर्मप्रसारासाठी स्कॉटलंडमधून थेट विदर्भात नागपूरला पाठविण्यात आले. सतत १५ महिने अभ्यास करुन आधी तो मराठी भाषा शिकला आणि मग त्याने तिथे शाळा सुरू केली. तीच शाळा आज ‘हिस्लॉप कॉलेज’ म्हणून ओळखली जाते. नागपूर परिसरातील जंगलांमध्ये फिरता फिरता त्याला गोंड भाषा कळू लागली व गोंड भाषेतील लोककथांनी त्याच्यावर मोहिनी घातली. त्या त्याने लिहून घेतल्या आणि त्यांचे इंग्रजीत भाषांतर केले. त्यातलीच एक कथा दुर्गाबाईंनी मराठीत अनुवाद करुन १९५१साली ‘गावकरी’च्या दिवाळी अंकात दिली होती. ती वाचताना आपण चकीत होतो, कारण ही कथा चक्क ‘मोगली’ या लोकप्रिय कथेसारखीच आहे. कदाचित मोगलीचा जन्मही याच कथेच्या प्रभावातून झाला असावा.  कथा वाचा म्हणजे ती किती जबरदस्त कल्पक आणि दृश्यमनोहर आहे ते लक्षात येईल. ज्या स्टिफन हिस्लॉपमुळे ही कथा गोंड भाषेतून इंग्रजीत आणि मग तिथून मराठीत पोहोचली तो हिस्लॉप नागपूर परिसरातील बोरी नदीचा प्रवाह घोड्यावर बसून ओलांडण्याच्या प्रयत्नात असताना १८६३ मध्ये मरण पावला. 'गावकरी'च्या १९५१ च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेली ही कथा तुमच्यासाठी पुनश्च... एका विशाल कळीतून एक बालक ज ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


कथा , भाषा , गावकरी

प्रतिक्रिया

  1. Shubhangi Kadganche

      4 वर्षांपूर्वी

    मोगलीचीच कथा की ही

  2. Shubhangi Kadganche

      4 वर्षांपूर्वी

    मोगलीचीच कथा की ही

  3. Shubhangi Kadganche

      4 वर्षांपूर्वी

    मोगलीचीच कथा की ही

  4. Axay27

      4 वर्षांपूर्वी

    Apratim khilavun thevnara....

  5. SUSHYANAND

      4 वर्षांपूर्वी

    सुंदर आहे गोष्ट.

  6. patankarsushama

      4 वर्षांपूर्वी

    छान गोष्ट

  7. psirane

      4 वर्षांपूर्वी

    छान

  8. amarsukruta

      5 वर्षांपूर्वी

    मस्तच गोष्ट होती धन्यवाद

  9. Kadganche

      5 वर्षांपूर्वी

    छान आहे कल्पनाविलास

  10. [email protected]

      5 वर्षांपूर्वी

    Sundar

  11. [email protected]

      5 वर्षांपूर्वी

    खूप सुंदर!

  12. [email protected]

      5 वर्षांपूर्वी

    खूप सुंदर! खरंच 'मोगली' ची कथा यावरूनच घेतली असावी!

  13. [email protected]

      5 वर्षांपूर्वी

    Khupach chan !!!

  14. rsrajurkar

      5 वर्षांपूर्वी

    निसर्गाशी एकरूप झालेला लिंगो. छान कल्पक कथा.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen