असा धरी छंद...


पुनश्चच्या स्वमदत या सदराखालील हा लेख. हल्ली सगळीकडेच स्वमदत उर्फ self help पुस्तकांचा बोलबाला आहे. त्यामुळे पुनश्च मध्ये देखील उपयोजित लिखाण हवं असं आम्हाला वाटलं . नाडकर्णीसरांचा हा छंदाविषयीचा लेख त्यासाठी एकदम योग्य वाटला. डॉ आनंद नाडकर्णी हे चतुरस्त्र व्यक्तिमत्व आहे. मानसोपचारतज्ज्ञ तर ते आहेतच पण त्याचबरोबर लेखक, नाटककार, प्रभावी संवादक याही भूमिका ते उत्तम प्रकारे निभावतात. छंदाविषयी लिहिलेला हा त्यांचा लेख आपल्याला अंतर्मुख करतो. या लेखाच्या निमित्ताने प्रत्येकाने स्वतःच्या आत डोकावून पाहत आपापला छंद ओळखावा आणि त्यावर लगेच  प्रत्यक्षात आणावा.  अंक : निवडक कालनिर्णय  जवळजवळ बारा वर्षांपूर्वीची गोष्ट. डोळ्यातली सारी चमक हरवून बसलेला गोपी सुन्नपणे हॉस्पिटलातल्या त्याच्या खाटेवर पडून होता. त्याच्या अंगातले गर्दचे प्रमाण कमी होण्याची प्रक्रिया म्हणजे ‘विथड्रॉवल  सिम्प्टम्स’ आता उपचारांनी ताब्यात येत होते. पण सहा वर्षांच्या व्यसनाधिनतेने अंगामध्ये असलेल्या सगळ्या कसबांची पार विल्हेवाट लावली होती. गर्द सोडले खरे पण पुढे काय ? मला कुणीतरी सांगितले होते की, गोपीला चित्रकलेमध्ये गती आहे. मी काही कोरे कागद आणि क्रेयॉन्स, पेन्सिली मुद्दामहून त्याच्यासाठी आणल्या. त्याला दाखवल्या. तो खिन्न हसला. त्याच्या औषधाच्या आणि केळ्या-बिस्किटांच्या बरोबर या वस्तूसुद्धा शेजारच्या छोट्या टेबलावर पडून होत्या. ....एक दिवस ...दोन दिवस. तिसऱ्या दिवशी रात्री मी राऊंड घ्यायला वॉर्डात आलो तर गोपीने मला बोट दाखवून सांगितले, “तिथे पहा...” समोरच्या भिंतीवर एक ड्र ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


कालनिर्णय , आरोग्य , मनसंवाद , व्यक्तिमत्व विकास

प्रतिक्रिया

  1. shripad

      5 वर्षांपूर्वी

    छान!

  2. Kiran Joshi

      7 वर्षांपूर्वी

    Chhandavishayi ha lalitlekh avadala!

  3. dhampall

      8 वर्षांपूर्वी

    छान लेख

  4. [email protected]

      8 वर्षांपूर्वी

    छंद म्हणजे सहावे सुखंच. ज्याला हे सापडले त्याच्या जीवनातल्या पोकळ्या नाहीशा होतात आणि आनंदाच्या पाकळ्यांनी वाट मखमाली होते. अतिशय सुंदर लेख.

  5. Smita

      8 वर्षांपूर्वी

    Aaj chya dhakadhakichya aayushyat mansala kahi tari chhad jopasnyachi aksharsha GARAJ vatavi ashi paristhiti aahe ...for being stress-free ... Dr Nadakarni mhanat tase ...mag aajubajuchi manase hi tanav rahit houn jatat ...



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen