अंक : केसरी दिवाळी अंक - ऑक्टोबर १९६२ लेखाबद्दल थोडेसे : नरहर विष्णू तथा काकासाहेब गाडगीळ स्वतंत्र भारताच्या पहिल्या केंद्रीय मंत्रीमंडळात( १९४७ ते १९५२ ) मंत्री होते. नेहरूंशी झालेल्या मतभेदांमुळे त्यांना पुढच्या ५ वर्षांसाठी संधी नाकारण्यात आली. काय होते ते मतभेद? का त्यांना पुन्हा संधी नाकारण्यात आली? या प्रश्नांची उत्तरं आणि मंत्रिपदाच्या या काळात त्यांना आलेले अनुभव त्यांनी या लेखातून मांडले आहेत. १९६२ मध्ये केसरी दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला हा लेख तुमच्यासाठी पुनश्च... ******** “साहेब आता मोटार चांगली दिसत नाही.” चंदनसिंग बोलता झाला. त्याने पांच मिनिटांपूर्वीच मंत्रिपदनिदर्शक झेंडा व अशोकचक्र मोटारीपासून काढून घेऊन कॅबिनेट सेक्रेटरीएटकडे धाडले होते. ता. १२ मे १९५२ चा दिवस होता. त्या दिवशी जुने मंत्रिमंडळ समाप्त झाले. नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी ९ वाजतां व्हावयाचा होता. मंत्रिमंडळांत न घेतल्याने ही सत्तेची कवचकुंडले काढून परत केली होती; आणि या मागे केवढा इतिहास होता! काही नाटककार आनंदपर्यवसायी नाट्यकृतीत चमकतात तर काही शोकांतिकांच्या रचनेत नाट्यकलाकृतीचा उत्कर्ष गाठतात. तसेच थोडे अधिकारग्रहण व त्याग या प्रसंगांतून जातांना अनेक व्यक्तींच्या जीवनात घडून येते. स्थितप्रज्ञ मी नव्हतो. सुखदुःख यांना समान मानले होते असेही नाही. ‘लाभालाभो’ यांना नेहमीच सारखे लेखले असेही नाही; पण खरे सांगावयाचे म्हणजे अधिकारमुक्तीमुळे एक प्रकारची अननुभवलेली शांतता व समाधान लाभले होते. क्षणभर दीर्घ कारागृहवासानंतर मुक्तिदिनी मुक्त झालेल्या मनुष्याला जसे वाटते तसे थोडे वाट ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
बाबुराव शिंदे
7 वर्षांपूर्वीकाकासाहेबांनी लिहलेल्या राजकीय आत्मकथनात बहुदा त्याचे नाव 'लाल किल्ल्याच्या सावलीत',असे असावे.आता नेमके आठवत नाही. ते मी वाचले आहे.त्यात या आठवणी आहेत.त्यांच्याकडे राज्यपालपदाचा प्रस्ताव घेऊन आलेल्या व्यक्तीचेही नाव असावे....काकासाहेब खूप मोठी व्यक्ती.. सीडी,काकासाहेब,नाथ पै,आंबेडकर,मधू लिमये,यशवंतराव ही लोकमान्यांनंतर राष्ट्रीय राजकारणात चमकलेली मोठीच माणसं...!!
mangeshnabar
7 वर्षांपूर्वीऐतिहासिक माहिती व घटना यांची सजगतेने घेतलेली नोंद या शब्दात या १९६२ च्या लेखकाविषयी म्हणतां येईल. मला हा लेख पुन्हा सविस्तर असा वाटायला हवा. धन्यवाद.