विनोदी लेखकांवरील बहारदार खटला

अंक – ललित – जून १९७०

लेखाबद्दल थोडेसे: साहित्य आणि साहित्यिक यांच्यावरील विनोदाची मराठीत खूपच वानवा आहे. ठणठणपाळने काही प्रमाणात ही उणीव भरुन काढली होती. ज्या ललित मासिकात ठणठणपाळ अवतरले आणि रमले त्याच ललितच्या पन्नास वर्षांपूर्वीच्या अंकातला हा लेख आहे. त्याकाळी मराठी लेखकांना चांगलेच ग्लॅमर होते आणि त्यांच्यावरील विनोदांना दाद मिळण्याइतपत त्यांच्या लकबी, सवयी, नातेसंबंध वाचकांना माहिती होते. रमेश मंत्री यांच्या पाच पुस्तकांच्या प्रकाशनाचा समारंभ झाला, त्याला मोठे साहित्यिक- पत्रकार उपस्थित होते. हा समारंभ नेहमीसारखा नव्हता तर त्यात अनेक गंमती-जमती, अभिरूप न्यायालय वगैरे प्रकार केले गेले. त्याचा हा वृत्तांतरुपी लेखही तेवढाच बहारदार झालेला आहे. वाचताना ती माणसे, तो काळ डोळ्यांपुढे उभा राहतो. वृत्तांत लिहिणाऱ्या लेखकाने ‘नारद’ या टोपण नावाने हा लेख लिहिलेला आहे, खरे तर जे घडले तेच लिहिलेले आहे, त्यामुळे टोपण नाव घेण्याची काही गरज नव्हती. मग ते का बरे घेतले असावे? त्यावेळी अशा प्रकारचे लिखाण करणारे जयवंत दळवी, सुभाष भेंडे यांनी हे लिहिले असावे का? ‘पुनश्च’ने बरीच चौकशी केली. खुद्द अशोक कोठावळे (ललितचे आताचे संपादक) यांना काही माहिती आहे का याचीही चाचपणी केली, परंतु नारदाची ‘शेंडी’ काही हाती लागली नाही. मात्र एक कयास आम्ही केला आहे. मंत्री यांच्या पुस्तकांच्या प्रकाशनाचा समारंभ होता, त्यामुळे त्यांनी स्वतःच असा लेख लिहिणे प्रशस्त वाटले नसते, त्यामुळे त्यांनी स्वतःच तर नारद हे नाव धारण करुन लिहिले नसेल ना? वाचकांपैकी कोणाला याबाबत अधिक माहिती असेल तर त्यांनी ती निश्चित द्यावी.

ललितच्या जून १९७० च्या अंकात प्रसिद्ध झालेला हा लेख तुमच्यासाठी पुनश्च…

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

This Post Has 10 Comments

 1. cavivekdeshmukh@gmail.com

  विलक्षण

 2. ppkchemicals@gmail.com

  मस्त आवडला

 3. smmohite.hr@outlook.com

  अफलातून

 4. smmohite.hr@outlook.com

  खुप छान

 5. spruha

  🤣🤣🤣🤣🤣

 6. hemant.a.marathe@gmail.com

  किती खेळीमेळीच्या वातावरणात हा समारंभ पार पडला, प्रथितयश लेखक तेव्हा एकमेकांना दाद देत असत हे यातून दिसून येते

 7. ajitbmunj

  अप्रतिम

 8. Kantilal-Oswal

  अप्रतिम…

 9. ajitpatankar

  खूप छान लेख.. मस्त चिमटे काढले आहे.. टीका निर्विष आहे… हा लेख रमेश मंत्री यांनीच लिहिला असेल हा तर्क योग्य वाटतो.. पण लेखातील चिमटे आणि शैली ठणठणपाळ ची वाटते.. त्यामुळे नक्की निष्कर्ष काढता येत नाही..

 10. atmaram-jagdale

  खूपच अभिनव प्रयोग .

Leave a Reply