एका वाचकाची गोष्ट

पुनश्च    शं. ना. नवरे    2021-06-19 06:00:02   

अंक – शशी दिवाळी अंक – १९५९

त्या दिवशी मी फर्स्टक्लासमध्ये बसलो होतो. मला लौकर जायचं असल्यामुळं मी नेहमीपेक्षां आधीच्या गाडीनं निघालो होतो. डब्यात गर्दी नव्हतीच. नाही म्हणायला, त्या डब्यात दोनचार स्त्रिया होत्या.

त्या स्त्रियांकडे सहजपणे पहातां येईल अशी जागा पाहून मी बसलो. त्या स्त्रियांत एक तरुणी होती. गोरी गोरी. अंगानं खूप भरलेली. पाणीदार डोळ्यांची. मानेपर्यंतच रुळणार पिंगट शेपटे असलेली. तिची गंमत होती ती डोळ्यांत आणि लालभडक ओठांत. तिचे ओठ इतके आकर्षक होते की माझी नजर त्यांवरून हलेना. ते आपल्या ओठांत घेऊन चोखत रहावेत असं वाटूं लागलं. इतकं वाटूं लागलं की माझी नजर तिला तसं सांगू लागली असावी! कारण त्या तरुणीनं डोळे मोठे करून माझ्याकडे रागानं बघितलं आणि आपलं नाक उडवलं, अगदी तिरस्कारानं.

मलाही राग आला. माझा आला नि तिचाही आला. माझ्यासारख्या ऐटबाज तरुणानं तिच्याकडे बघितले यांत कांही फारशी चूक झाली नव्हती. चूक होती ती माझ्या मनांतली इच्छा डोळ्यांवाटे मी खुशाल दाखवू दिली ही! त्या तरुणीनं माझ्याकडे पाहून नाक उडावायचं कांही कारण नव्हतं. तिच्या नजरेतला राग मला समज द्यायला पुरेसा होता.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


कथा , शशी

प्रतिक्रिया

 1. Sanjay Bhat

    2 महिन्यांपूर्वी

  👌👌

 2. Medha Vaidya

    2 महिन्यांपूर्वी

  गोष्ट आवडली

 3. Suresh Kulkarni

    2 महिन्यांपूर्वी

  प्रवासातच प्रवासाची सांगता ,हे कुसुमाग्रज ब्रीद नवरे यांनीही पाळलं आहे या कथा वास्तूत ?

 4. Kiran Joshi

    2 महिन्यांपूर्वी

  अप्रतिम! फॅन्टास्टिक शन्ना....!

 5. Hemant Marathe

    2 महिन्यांपूर्वी

  नेहमीप्रमाणेच शं.नां. ची एक उत्कृष्ट कथा

 6. Mukund Deshpande

    2 महिन्यांपूर्वी

  उत्कंठावर्धक छान गोष्ट

 7. jyoti patwardhan

    2 महिन्यांपूर्वी

  छान आहे गोष्टवाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen