छुपाते छुपाते बयाँ हो गयी है....भाग १


‘पोरीचा गळा बरा आहे’  असे माझ्याबद्दल बोललं जात असलं तरी, लहानपणी माझ्या सौंदर्याची तारीफ क्वचितच झाली असावी. माझ्या आजीला मात्र मी गायिका होण्यापेक्षा नायिका व्हावं असंच मनापासून वाटत होतं. काहीजणांनी तर तिला 'तुमच्या नातीचं थोबाड पाहिलंत का?’ अशा शेलक्या शब्दांत माझ्या देखणेपणाचं सत्य सांगितलं होतं, मात्र सर्वात मोठा आघात केला होता तो व्ही. शांताराम यांनी. मी लहानपणापासून शांतारामबापूंचे चित्रपट अगदी आवडीने पहायची. त्यांच्या चित्रपटात काम करावे, असे मला खूप वाटायचे त्यामुळे आजी मला सुरुवातीला त्यांच्याकडेच घेऊन गेली. बापूंनी माझे गाणे ऐकून घेतले, मात्र ‘ही मुलगी कधीच गायिका होऊ शकणार नाही आणि नायिका तर मुळीच नाही, कशाला हिला सिनेमात घालता, सरळ लग्न लावून टाका’ असे सांगितले. बापूसारख्या रत्नपारख्याने माझी अशी पारख केल्याने आजीची पार निराशा झाली. चित्रपटात काम करणे हे माझे ध्येय नव्हतेच तरीही मी त्यावेळी ओक्साबोक्सी रडले होते, ते केवळ स्वतःविषयी वाईट अभिप्राय ऐकून.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया

  1. Abhinav Benodekar

      4 वर्षांपूर्वी

    शांतारामबापूंना सुरैयामध्ये काही गुण दिसलें नाहीत, पण पुढे तिचे नाव झाल्यावर त्यांनी प्रतिक्रिया द्यायला हवी होती. नीलम मला वाटते अभ्यास करण्यासारखी व्यक्ती आहे, कारण नर्गिसची सुद्धा ती जवळची मैत्रीण, अगदी राजकपूरशी दुसरे लग्न करण्याची परवानगी मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याकडे नर्गिस नीलमला बरोबर घेऊन गेली होती!

  2. Varsha Sidhaye

      4 वर्षांपूर्वी

    pudhcha bhag vachaychi utsukta !

  3. Mukund Deshpande

      4 वर्षांपूर्वी

    सुरेख आहे लेख, उद्या च्या भागाची उत्सुकता वाढली आहे

  4. Dr. Anil Sangle

      4 वर्षांपूर्वी

    खूप सुंदर शब्दांमध्ये सुरैय्याच्या जीवन प्रवासाची दास्ता ह्या लेखामध्ये बयान केली गेली आहे ... आता ह्या सौंदर्यसम्राज्ञीची पुढील प्रवास जाणून घेण्याची उत्सुकता लागून राहिली आहे !!



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen