अंकः लोकराज्य, डिसेंबर २००१-जानेवारी २००२
लेखाबद्द्ल थोडेसे : भोसल्यांच्या पराक्रमाचा विषय निघाल्यावर फार कमी लोकांना नागपूर आठवते आणि त्याहूनही कमी लोकांना रघुजी भोसले आठवतात. सतत २१ वर्षे वऱ्हाडात नेकीने राज्य करुन बंगाल-ओरिसापर्यंत धडक मारणारे रघुजी भोसले हे अतुल्य मराठी वीर होते. त्यांच्या पराक्रमाची ही गाथा थक्क करुन सोडणारी आहे.
********
रघुजीच्या बालपणाबद्दल हकिकत फारशी उपलब्ध नाही. त्याची आई काशीबाई व आजी बदाबाई यांना रघुजीबद्दल फार काळजी वाटत होती. कारण रघुजीचे वडील बिंबाजी रघुजीच्या जन्मानंतर लवकरच मरण पावले. लहानपणी रघुजी पांडववाडीत राहात होता. पांडववाडी (वाईजवळ) येते रामाजीपंत कोल्हटकर म्हणून एक रामभक्त राहात होता. त्यांच्या वरदानाने रघुजीचा जन्म झाला असे त्याचे आईबाप मानीत. रामाजीपंताचे पुत्र कोन्हेरराम व भास्करराम ह्यांच्या संबंधामुळेच रघुजी नागपुरात आले. थोडा मोठा झाल्यानंतर रघुजी आपली काकू रामाऊ (साबाजीची बायको) हिजपाशी राहत असे. तला मूलबाळ नसल्यामुळे तिलाही त्याचा लळा लागला. रघुजी थोडा मोठा झाल्यानंतर त्यास २८ जून १७२२ रोजी शिवाजी करांडे यांच्या हाताखाली राणोजी बोसले यांच्या सैन्यात ठेवण्यात आले.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
JAYANT PRABHUNE
4 वर्षांपूर्वीअप्रतिम लेख