माझा मराठीचा अभ्यास बरा होता. अवांतर वाचनहि मी खूप करी. त्यावेळीं प्रसिद्ध होणाऱ्या यशवंत, किर्लोस्करमधील कथा, फडके-खांडेकरांच्या कादंबऱ्या, कविता यांवर आम्हीं खूप बोलायचें. त्याला किती अर्थ होता देव जाणें! पण बोलतांना आपण कुणीतरी मोठे आहोत असं वाटायचं. कुसुम मोठ्या आपलेपणानें नि कुतूहलाने सारं ऐकत असे. कधीं बोलपटांची चर्चा चालायचीं. मी मुद्दाम म्हणायचा, 'मी आज एक पिक्चर पाह्यलं बरं का कुसुम! त्यांतली नायिका अगदी तुझ्यासारखी होती! तुझ्यासारखी म्हणजे काय? अगदी बरोबर तूंच !...’
कुसुम नुसतीच हंसायची. कधीं कधीं ती कविता म्हणायची, तिचा आवाज फार गोड होता. निदान मला तरी तसं वाटायचं.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .