राष्ट्रीय सभेच्या घटनेंत पहिला महत्वाचा फरक म्हणजे प्रतिनिधींची संख्या कमी होणें. आतांपर्यंत प्रतिनिधींची संख्या ६००० होती, व त्यांच्या निवडणुकीसंबधानें ठराविक नियम असे कांहींच नव्हते. यापुढे त्यांची संख्या फक्त २००० करण्यांत आली असून किती प्रतिनिधी निवडायचे हें त्या त्या प्रांतांत किंवा जिल्ह्यांत काँग्रेसचें सहा महिनेपुर्वीपासून किती सभासद झालेले आहेत यावर अवलंबून राहील. साधारणतः दर पांचशें सभासदांना एक प्रतिनिधी निवडता यावा अशी योजना आहे. बरे, काँग्रेसचे सभासद होणें तरी पूर्वीसासारखें सोपें आहे का? प्रत्येक सभासदानें काँग्रेससाठी कांही तरी शारीरिक कष्ट केले पाहिजे असा या बद्दलचा मोघम ठराव करण्यांत आला आहे. वर्किंग कमिटीही याबद्दल विस्तृत सूचना लवकरच प्रसिद्ध करणार आहे.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .