होमरूलसाठी देशांत चळवळ सुरू होताच सरकारी दडपशाहीचीही उठावणी हळू हळू होऊ लागली. लॉर्ड चेम्सफोर्डसाहेबांची या वेळी कारकीर्द सुरू होती. मे १९१७ अखेर हिंदुस्थानसरकारने एक ठराव प्रसिद्ध करून असे म्हटले की, भारतसंरक्षक सैन्याची योजना पुढार्यांच्या कुचराईमुळे सफल झाली नाही. याचा सरळ अर्थ असा होता की, हिंदुस्तान सैन्याची मदत करीत नाही आणि स्वराज्य मात्र पाहिजे, ते कसे मिळणार? मद्रासचे गव्हर्नर लॉर्ड पेटलंड यांनी याच सुमारास एक भाषण केले. त्यात ते म्हणाले, “हिंदी लोकांचे साध्या सुधारणांनी समाधान न होता ते जबाबदारीचे स्वराज्य व तेही ताबडतोब मागू लागले आहेत. आणि तर देणे शक्य नाही.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .