आणि मग हें भांडण मिटतें. क्षणांत हंसणाऱ्या नि क्षणांत रुसणाऱ्या ह्या शेजारणी म्हणजे जणूं लोकलच्या सिग्नलचे दिवे. क्षणांत लाल तर क्षणांत हिरवे!! आपल्या मुलीच्या आगमनासाठी आतुर झालेल्या आईचें अंतःकरण ह्यांत ओतलें आहे. इकडे माहेराला जायला निघालेली मालण आपल्या चाळींतील शेजारणीचा निरोप घेते आहे. निघतांना देखील खूपशा आनंदाबरोबर तिच्या उरांत लहानशी काळजी आहे. आपल्या विरहानें व्याकुळ होणाऱ्या पतीचें चित्र ती मैत्रिणीपुढे रेखाटते. तिच्या घरीं चाळींत एकमेव असणारा रेडिओ ऐकायला दुपारच्या बायका जमतात त्यांना ती सांगते.
शेजारच्या ग सयांनो । बंद रेडिओ ठेवावा ।
साऱ्या राती जागरण । त्यांना हवा गं विसावा ।
दिशीं पंध्राव्या सोडून । येतें माहेराच्या गांवा ।
मुभा देईन तेधवां । कोकणी कार्यावळ लावा ।
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .