कलियुगातील पंधरावी विद्या

पुनश्च    न. चिं. केळकर    2023-01-25 10:00:04   

अशा रीतीने जाहिराती ह्या वर्तमानपत्रकारांस किफायतशीर आहेतच, परंतु जाहिराती देणाऱ्यास त्या याहूनही अधिक किफायतशीर असतात. वर्तमानपत्रांच्या वाचकांची साधारण प्रवृत्तीवर सांगितलीच आहे. व मुद्दाम जाहिराती वाचणारे ‘वाचक’ शेकडा पाच तरी सापडतील की नाही कोणास ठाऊक? एखाद्या वाचकांच्या अड्यांत ताजे वर्तमानपत्र आले असता ‘काय बुवा, आज काय नवी बातमी आहे! आज कशावर अग्रलेखाची झोड उठली आहे?’ वगैरे पृच्छा हटकून व्हावयाचीच; परंतु ‘काय बुवा, आज कशाकशाच्या नव्या जाहिराती आल्या आहेत?’ असे विचारल्याचे कधी कोणी ऐकले नसेल. वर्तमानपत्राच्या वाचकांचे लक्ष त्यांतील जाहिरातींवर फक्त जाता जाता ओझरते व आकस्मिकच जावयाचे. घडी मोडीत असता, पान उलटीत असता त्यांकडे नजर जावयाची व अशा घसरल्या नजरेखाली आलेल्या पदार्थांचे सविकल्पक ज्ञान अर्थातच होऊ शकत नाही.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .ज्ञान रंजन

प्रतिक्रिया

  1. JAYANT PRABHUNE

      9 महिन्यांपूर्वी

    मस्तवाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen