बहुतेक सुशिक्षित माणसाला, विशेषतः साहित्यिक गंध लावलेल्या माणसाला कोणताही अनुभव आपण शब्दांत सांगू शकतो हा भ्रम फार. त्यामुळे एखादा प्रसंग सांगताना लिहिताना शब्दांचे, वाक्यांचे अनेक पर्याय तो वाचकांपुढे टाकीत जातो. त्यानं फक्त मजकुराचा भार वाढतो. त्यामुळे असंही आढळतं की, नाटककाराला नाटक हे चित्र म्हणून दिसले नाही तर ते नाट्यवाचन होते व त्याच मार्गानं चित्रपटाचा चक्क रेडिओ होतो. केव्हा केव्हा उत्साही ग्राहक, प्रकाशक चित्रात बदल (सुधारणा म्हणा) सुचवितात तेव्हा प्रश्नच येतो. बदलानंतर होणारे संपूर्ण चित्र त्यांना दिसत नसते. ते सांगणार कोण?
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .