बाकी हे मात्र खरं हं,--पूर्वीपेक्षा आतां जगांत नवीन नवीन गंमती घडताहेत. रोज पहावं तर काही ना काही गंमत ऐकायला मिळते. गांधीनं इंग्रजांशी लढाई करायला बंदुका आणि तलवारीऐवजी चरखे आणि टकळ्या तयार केल्या, तेव्हांपासून या गंमतींना सुरुवात झाली. सुतानं स्वर्ग गाठतां येतो, मग स्वराज्य गाठतां कां येऊ नये? असंच त्यांना वाटलं असावं! म्हणून त्यांनी घरोघर चरख्याची घरघर सुरू केली. आतां माणसं घरांत रेडियो ठेवतात, तसा त्या वेळी चरखा ठेवायचे! आणि त्यांत त्यांनी उपासाचं नवीन अस्त्र सुरू केलं. त्यानं तर अजून हाहाःकार चालवला आहे! गांधींनी सुरुवात करून दिली—आतां जो तो उपासाचं अस्त्र वापरतो. सरळ बोलायची सोय नाही! फट् म्हणतां उपास—असं चाललं आहे.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .