अंक - मोहिनी, एप्रिल, १९५४
डॉक्टर कल्पनासुंदर ही व्यक्ति आमच्या क्लबांत एक चेष्टेचा विषय होऊन बसली होती. कमालीचा बावळट चेहरा, नाकावर घसरलेला चष्मा, त्यामागचे मधूनच मिचकावण्याची संवय असलेले घारे डोळे, अन् खूप ठिगळं लावलेले कपडे, एवढ्या भांडवलावरसुद्धां, त्यांची चेष्टा करून आमचं मनोरंजन करून घेण्यांत आम्हीं कित्येक तास दवडले असते. पण यांत भर म्हणूनच की काय, डॉक्टरमजकुरांना एक चमत्कारिक संवय होती – ती म्हणजे झोपेत चालण्याची. झोपेंत ते कितीहि लांबवर चालत जात!
आतां डॉक्टरांच्या या एकंदर वर्णनावरून, त्यांच्या दवाखान्यांतील बांकावरची धूळ पेशंटच्या कपड्यानं कधीं विशेष झटकली जात नसे, हैं वेगळं सांगायला नकोच!
एवंगुणविशिष्ट डॉक्टरांनीं एक दिवशीं तारखेत बोलायचं तर गेल्या जून महिन्याच्या चोवीस तारखेला रात्री आठ वाजतां आमच्या क्लबांत प्रवेश केला. आल्याबरोबर नेहमीप्रमाणं त्यांनीं आंतल्या मंडळीकडे पाहून स्मितहास्य केलं अन् संथ पावलं टाकीत ते कोपऱ्यांतल्या आपल्या ठराविक आरामखुर्चीत जाऊन बसले. माझा बिझिकचा डाव रंगांत आलेला होता. तरीहि मीं मान वळवून डॉक्टर बसलेल्या कोपऱ्याकडे नजर टाकली.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .