भाग दुसरा - प्रेमाचा स्फोट अथवा खासगी चार शब्द

पुनश्च    अज्ञात    2023-05-31 10:00:01   

अंकः केरळकोकिळ, जानेवारी १९०१

महाराज! आपण स्वामी आहांत, व कोकिळ सेवक आहे; आपण प्रभू आहात, कोकिळ आपला भक्त आहे; आपण कल्पतरू आहात व कोकिल आपला रोपा आहे; आपण कामधेनु आहात, कोकिळ तिचे वत्स आहे; आपण प्रेमदाते आहात, कोकिळ प्रेमयाचक आहे; आपण गुणग्राही आहात, कोकिळ गुणी आहे; आपण रसिक आहात, कोकिळ गवय्या आहे; आपण गुरू आहात व कोकिळ आपला शिष्य आहे. असे प्रेमळ नाते व दृढतर बंधन ज्या सर्वसाक्षी, सर्वातर्यामी व सर्व व्यापक परमेश्र्वराने जडवून आजपर्यंत अव्याहत चालविले, त्याला अनंद प्रणिपात करून अनंत उपकार मानतो. नंतर ज्या आपण संतसज्जनांनी मला आपल्या अंतःकरणमंदिरात शिरण्याची मुभा दिलीत; सद्वाक्यसुमनहार गुंफण्याचे काम मजवर सोपवून ज्ञानपरिमळाने प्रसन्नता पावण्याची माझ्या मनाला सोन्यासारखी संधी आणून दिलीत; माझ्या अल्पसेवेचा आपण स्वीकार केलात; माझ्या बोबड्या व वेड्यावाकड्या शब्दाला गोड करून गौरवाने त्याचे कौतुक केलेत; 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



नियतकालिक

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen