वालपाखाडीच्या 'सेक्शन'मध्ये आमच्या वासूनाक्याच्या कंपनीचा दरारा होता. आमच्या पुढें रुबाब करण्याची जिगर असलेला मायेचा पूत अजून जन्माला यायचा आहे, अशी आमची खात्री होती. कोणालाहि 'चरबी' आली तर ती उतरवायला आम्ही समर्थ होतों. या वासूनाक्यावर आम्हीं कित्येक लोकांना धडे शिकवले होते ! कांहीं कांहीं लोकांना मधूनमधून 'चरबी' येते. ते आमच्या कंपनीला 'मवाली', 'टोळभैरव म्हणतात. जोपर्यंत ते आपल्या घरांतच म्हणतात तोपर्यंत आमचें कांहीं म्हणणें नाहीं. म्हणा. पण जर कोणी आम्हांला 'पब्लिक' मध्ये म्हणाल, तर मग मात्र त्याला आम्ही बाराच्या भावांत पोहोचविल्याशिवाय रहाणारच नाहीं.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .