घरीं आलों, भरपूर जेवून घेतलं. इतक्यांत वडलांनी माझ्याजवळ येऊन मोठ्यानं बोलायला सुरवात केली. आज कित्येक महिन्यांनंतर ते माझ्याशी बोलत होते. मी अमूक अमूक बाईबरोबर लग्न करणार का म्हणून विचारले. मी गांगरलों. सारं काहीं अनपेक्षित होतं. त्याच बाईनं घेतलेल्या चुंबनांची धुंदी अजूनहि माझ्यावर होती. वडील प्रश्नांची सरबत्ती करत होते. तिच्याशीं लग्न करायचा माझा खरोखरीच विचार नव्हता. मी वडलांना है निक्षून सांगितले, पण ते मानायला तयार नव्हते. आई रडतच होती. एकूण तुम्हीं त्यांचे बरेच कान फुंकले होते. वडील ऐकून घेईनात. जीव द्यायची भाषा बोलू लागले.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .