पेशवे घराण्यातील तीन स्त्रिया प्रसिद्ध आहेत. पहिल्या बाजीरावाची आई राधाबाई, माधवराव पेशव्यांची आई गोपिकाबाई अन् तिसरी रघुनाथराव उर्फ राघोबादादांची बायको अन् दुसऱ्या बाजीरावाची आई आनंदीबाई. पहिल्या दोन कीर्तिवान ठरल्या. तिसरीच्या वाट्याला दुष्कीर्ती आली. कथाकार, कादंबरीकार, नाटककार अन् बखरकार या सर्वांनी आनंदीबाईस कारस्थानी अन् ‘ध’ चा ‘मा’ करणारी ठरविले. तेव्हापासून कुणाही जहांबाज बाईला ‘आनंदीबाई’ म्हणण्याचा प्रघात पडला. परंतु आनंदीबाई खरोखरच तशी भयंकर अन् खुनाला प्रोत्साहन देणारी स्त्री होती की काय हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे. नारायणराव पेशव्याच्या वधामुळे ती कलंकित ठरली तरी त्या प्रकरणी तिचे अंग असल्याचा प्रत्यक्ष पुरावा ऐतिहासिक कागदपत्रात आढळत नाही. उपलब्ध पुराव्याची छाननी केल्यास ती निर्दोष ठरते, अन् म्हणूनच तिचे चरित्र हृदयस्पर्शी अन् मनाला चटका लावणारे आहे. बदफैली नवरा अन् कुलक्षणी मुलगा यांच्या तिढ्यात या अश्राप स्त्रीला दुर्दैवाचे दशावतार भोगावे लागले. हिला जोडीदार चांगला लाभता तर ही पेशवे कुळाचे भूषण ठरली असती. आनंदीबाईचा जन्म १७४७ साली (सुमारास) रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर गावी झाला. हिच्या वडिलांचे नाव राघो महादेव ओक.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Abhinav Benodekar
4 वर्षांपूर्वीहल्ली इतिहासात खल ठरवलेल्या सर्वांना क्लीन चिट देण्याची टूम निघाली आहे. त्रंबकजी डेंगळे दुसरे बाजीराव, यशवंतराव होळकर आनंदीबाई काल काय आज काय! आता आपणच इंग्रजावर राज्य केले हे सिद्ध करता आले तर पहा! जर आंनदीबाई निर्दोष होती तर नाना फडणीसाने तिच्यावर मरेपर्यंत पहारा कां ठेवला होता?
5 वर्षांपूर्वी
nice information
कल्पना प्रधान
5 वर्षांपूर्वीछान पण अपूर्ण
Milind Barbade
5 वर्षांपूर्वीउत्तम लेख, आनंदी बाईना योग्य प्रकारे ओळखले नाही हे दुदैव
Varsha Deshmukh
5 वर्षांपूर्वीReally information about Anandibai and Gopikabai. Send mi books name
सुरेखा आग्रे
5 वर्षांपूर्वीखूप छान लेखन आहे .आणखी थोडी डिटेल हवी होती वाचणाऱ्यांची उत्सुकता वाढवणारी आहे .सुंदर!!!!!
Sanjay B.Kulkarni
5 वर्षांपूर्वीभाषा व विवेचन उत्तम
5 वर्षांपूर्वी
ध चा मा कोणी केला असेल वा का केला असेल हा संशोधनाचा विषय आहे, त्या वर संशोधन व्हावे.. म्हणजे आनंदीबाई खरो खरच अश्या नव्हत्या याला जोड मिळेल. तोपर्यंत त्या ध चा मा वाल्या आनंदीबाई राहतील.
5 वर्षांपूर्वी
Khupch Sundar mahiti
5 वर्षांपूर्वी
Your Comment Here...आनंदीबाई 8 वर्षाच्या होत्या हे माहिती नव्हते . खुप छान माहिती झाली .
प्रतिभा सुभाष पतके.
5 वर्षांपूर्वीआता पर्यंत ची माहिती ही खूपच चांगली न कळलेली आहे.
Sonali Mangrulkar
5 वर्षांपूर्वीKhupch sundat anandibai baddal etka vistrut pahilyanda vachnyat ala.atishay Sundar lekh
Anita Chandorkar
5 वर्षांपूर्वीखुप छान माहिति समजलि
मोहन महेश्वर ओक
5 वर्षांपूर्वीआंनदी बाई वरील लेख सुंदर आहे फक्त एक गोष्ट खटकते ती गुहागर ची माहेरवशींन नसून गुहागर तालुक्यातील मळण गावातील ओकांची म्हणजे आमची माहेरवाशीण आहे मी ही त्याच गावातील आहे तेवढी सुधारणा पुढील वेळी करा
Vrinda Lele
5 वर्षांपूर्वीखूप माहितीपूर्ण लेख आहे. किती तरी गोष्टी नव्याने कळल्या.
सौ. उज्ज्वला मुकूंद देशपांडे
5 वर्षांपूर्वीआनंदीबाई बद्दल नव्यानेच माहिती मिळाली. आणि सुसंगत असलेली माहिती ज्ञानात भर टाकणारी आहे. ऐश्वर्य भोगलेल्या स्रीयांना एवढे दुर्दैवी जिवन वाट्यास यावे हा दैवदुर्विलासच नाही का?
Vasanti Mate
5 वर्षांपूर्वीखूपच छान लेख आहे. खूपशा गोष्टी माहीतच नव्हत्या. खरंच colors मराठीने ह्याचा संदर्भ पण घ्यावा.
दिपा गोरे.
5 वर्षांपूर्वीखूप छान लेख.
दिपा गोरे
5 वर्षांपूर्वीखूप छान लेख. आनंदी बाईंबद्दल एवढी माहीती नव्यानेच कळते आहे.न कळत त्याच्यावरचा राग कधी गेला कळलेच नाही.
5 वर्षांपूर्वी
अप्रतिम लेख... colors marathi वर स्वामिनी पहात पहात लेख वाचला.... खुप विपर्यास दिसला दोन्ही गोष्टीत... जर वरील लेख बरोबर असेल तर colors marathi ने याची दखल घ्यावी....
सौ ज्योती सुधीर देशमुख
5 वर्षांपूर्वीखूप छान लेख लिहिला आहे इतिहासातील कित्येक माहीत नसलेल्या गोष्टी कळल्या खूप खूप धन्यवाद
Rachana bakshi
5 वर्षांपूर्वीखुप छान लिहले आहे इतिहासाच्या गोष्टी कळल्या वर सिरियल पाहायची उत्सुकता अजुन वाढते.
5 वर्षांपूर्वी
अतिशय उत्तम लेख आहे इतकी महत्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
ऋचा
5 वर्षांपूर्वीआरती ताई मला तुमच्या प्रयोगाचे डिटेल्स मिळू शकतील का प्लीज?
सौ प्रज्ञा श्रीपाद करंदीकर
5 वर्षांपूर्वीआनंदी बाईबद्दल इतकं विस्तृत पहिल्यांदाच वाचलं पण पेशव्यांच्या सगळ्याच स्रिया ह्या दुर्दैवी ठरल्या त्यांच्या वाट्याला काहींना काही दुःख होतेच मग त्या काशी बाईसाहेब,गोपिकाबाई,जानकीबाई,लक्ष्मीबाई,रमाबाई सगळ्याच दुर्दैवी
Anil Kulkarni
5 वर्षांपूर्वीअभ्यासपूर्ण.मनोरंजक. वाचणे सोडवत नाही.
AartiMunishwar
7 वर्षांपूर्वीअभ्यासपूर्ण लेख आहे..... तुम्हीही करू शकता सर..
AartiMunishwar
7 वर्षांपूर्वीअतिशय सुंदर लेख.... मी अभ्यास केला आहे आणि आनंदी बाई.. एक व्यथा हा एकपात्री प्रयोग करते तो केवळ आनंदी बाई लोकांपर्यंत पोचावी इतक्याच उद्देशाने.... dha चा ma केल्याचा कुठेही पुरावा नाही.... अप्रतिम लेख..
Siddheshwar
7 वर्षांपूर्वीअनंदीबाईंचे उदात्तीकरण करण्याच्या नादात नारायणरावांच्या खुनाला सदर लेखक वध म्हणालेत आणि तेही तीन वेळा एकाच लेखात
mugdhabhide
7 वर्षांपूर्वीएकदम छान लेख .मस्त माहिती होती
deepa_ajay
7 वर्षांपूर्वीआनंदी बाई वर एवढं पहिल्यादाच वाचायला मिळाले मनःपूर्वक धन्यवाद
pradnyakulkarni
7 वर्षांपूर्वीसुंदर लेख ! खूप वेगळ्या गोष्टी वाचायला मिळाल्या ??
किरण भिडे
7 वर्षांपूर्वीनितीनजी, आपल्याला काय म्हणायचे आहे ते नीटसे कळले नाही. कृपया प्रतिक्रिया थोडी सविस्तर द्यावी.
varsha sanap
7 वर्षांपूर्वीwants to know detail information .
नितीन धिरडे
7 वर्षांपूर्वीवि .दा .सावरकर
bookworm
7 वर्षांपूर्वी१९६४ सालच्या या लेखाची पुरेशी दखल घेतली गेलेली नाही असे दिसते
bookworm
7 वर्षांपूर्वीअभ्यासपूर्ण लेख, खरं तर हा एखाद्या पुस्तकाचा विषय आहे. आनंदीबाईंवर खापर फोडण्याचा प्रयत्न होत असेल तर ते चुकीचेच आहे. ती जर पूर्णपणे निर्दोष असेल तर इतिहासकारांनी ती बाजू देखील मांडली पाहिजे.