"बरं अंत्यविधी झटकन् उरकूं म्हणावं तर तेंहि नाहीं. त्या दिवशीं पाऊस म्हणजे काय धो धो पडत होता! आकाश फाटलं होतं जणुं कांहीं! क्षयानं चघळूनचघळून फेंकलेली शंकऱ्याची हाडं आम्हीं मुसळधार पावसांतनं स्मशानांत नेलीं. – आमच्या गांवचं स्मशान गांवापासून तीन मैलांवर आहे, तीन! चेष्टा नाहीं. स्मशानयात्रेसाठी चार माणसं जमवतांना आम्हांला आठ तास भीक मागावी लागली, पन्नास घरीं तोंड वेंगाडावं लागलं; आणि गंमत अशीं कीं त्या मुसळधार पावसांतून भिजत जात असतांना चौघांपैकीं एकाला अशी हुडहुडी भरून आली म्हणतां! आम्हांला वाटलं, शंकऱ्याबरोबर याचीहि स्मशानयात्रा काढावी लागणार बहुतेक!"
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .