सुरवातीच्या काळांत 'जेधे-जाधव-जवळकर' ही त्रयी महाराष्ट्रांत या चळवळीची सूत्रधार होती. परंतु जवळकरांनी वक्तृत्व गाजविलें, इहपरलोकी (विलायत!) मजा भोगली, जाधवांनीं मंत्रीपद नऊ वर्षे उपभोगलें, दिवाणगिऱ्या मिळविल्या, परदेशगमनाची संधी घेतली आणि दोघांनीहि सत्यशोधनाच्या चळवळीला गौणत्व देऊन व्यक्तिगत फायदे मिळविले. कांहीं नातेवाईक व स्नेहीसोबती यांना चांगल्या नोकऱ्या मिळवून दिल्या, पण समाजाच्या कायमच्या प्रगतीच्या दृष्टीने यदृच्छया घडले त्यापेक्षा जास्त काही त्यांनी केले नाही. श्री भास्करराव जाधव यांच्या गाढ व्यासंगाबद्दल व विद्वत्तेबद्दल मला आदर आहे पण त्या मानाने त्यांनी राष्ट्राच्या पदरात मोठेसे भरीव कार्याचे माप टाकले नाही, असेच मोठ्या खेदाने म्हणावे लागते.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Atul Shah
8 महिन्यांपूर्वीउत्तरार्ध केव्हा उपलब्ध होणार ?