'केम आतलेकर, तमे आना एटला सारा वाळ काढी नाखवा मांगोश के ?" असा प्रश्न केला. "होय! काढायलाच हवेत. संन्याशाचे काम आहे; मुंडन केलेच पाहिजे." आळतेकरांनी उत्तर केलें "ना! ना !! मेकप विकपनी कांई सगवड थाय तो जुओ न ! केम रुस्तम, तमे केम लागे ?" शेटनी बाजूला बसलेल्या रुस्तुमबाबाला विचारलें. होला हो कसा द्यावयाचा या कामांत चित्रपट सृष्टीत शेट लोकांच्या सभोवार घोटाळणारी माणसें मोठीं तरबेज आणि तत्पर असतात. रुस्तुमबाबाने ताबडतोब आर्देसर शेटच्या सुरांत सूर मिळवून, 'डोक्यावर सफेत कपडा बांधून त्यावर सव्वीस नंबरचा ग्रीजपेंट लावला तर डोके मुंडन केल्यासारखें दिसण्यास काही हरकत नाही,' असे आपले मत ठोकून दिलें. बिचाऱ्या आळतेकरांपुढे हा भलताच पंचप्रसंग उभा राहिला.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .