पुष्कळ माणसांचें असें होतें; त्यांना थोडी मान्यता मिळू लागली, लोक त्यांस मोठेपणा देऊ लागले, कीं, त्यांच्या बुद्धीला फाटे फुटूं लागतात. मग ते नाहीं त्या फंदांत पडतात किंवा नाना प्रकारचीं खेंकटीं निर्माण करून जगाच्या अनादरास प्राप्त होतात. बोरी मास्तरांचें वर्तन याच्या अगदी उलट होतें. शाळेचे काम त्यांच्यामागे होतेच. शिवाय ते धार्मिक वृत्तीचे असल्यामुळे त्यांचा पुष्कळ वेळ स्नानसंध्या, जप, अनुष्ठान, देवपूजा, पोथी वाचणे, देवदर्शन यांत जाई. दूधदुभतें स्वस्त होतें तरी त्यांना शेतीचा व जनावरांचा शोक असल्यामुळे त्यांनीं दुभत्याचें जनावर पाळलें होतें व त्याची जोपासना करण्याचे कार्यही ते स्वतः करीत.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .