हीच खंबीर वृत्ति त्यांनी गोवा, दीव, दमण, पाँडिचरी वगैरे भागांचे सूत्रचालन गृहखात्याकडे देतांना दाखविली. शेख अब्दुल्ला काय किंवा डावे कम्युनिस्ट काय (स्थानबद्ध) यांचे बाबतही उरी उदंड माया बाळगणारे शास्त्रीजी द्रवले नाही. झटपट आणि खंबीरपणे निर्णय घेण्याची क्षमता त्या माणसाजवळ होती आणि म्हणूनच अल्प काळात त्यांनी कितीतरी महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यांचा उरक मोठा होता. कामावर त्यांची पकड होती. Vision होती. द्रष्टेपण होते. सेवापरायणता होती. सुरक्षा मंडळातील 'राजकारणालाही’ त्यांनी अचुक ओळखले आणि त्याचे 'वस्त्रहरण' ही त्यांनी केले.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .