मध्यंतर झालं. आतां आणखी सव्वा तास झाल्यावर ह्या सुखाची पूर्णता होणार असा हिशेब करीत मी बाहेर आलो. तीहि आली. पलीकडल्या बॉक्समधून भाई नि त्याची ती दुसरी मुलगी आली. मीं भाईच्या चेहऱ्याकडे पाहिलं. मला वाटलं, माझ्यासारखाच त्याचा चेहरा एका निराळ्या आनंदानं, सुखानं फुललेला असेल. पण तसं कांहीं दिसलं नाहीं. त्यानं मला विचारलं, मराठींत हं, "कसं काय वाटलं ?”
"एकदम झकास. तुझ्यावर मी खूष आहें, भाई !"
मग आम्ही चौघेंहि कांहीं तरी बोलत उभीं राहिलों. एवढ्यांत एकदम कांहीं तरी आठवल्यासारखं करून भाई म्हणाला, "आपण बाहेर जायचं चहा घ्यायला ?"
"नो, थँक्स. आपण वाटल्यास इथं स्टॉलवर घेऊं " त्यांतली एक मुलगी म्हणाली. मी लगेच होकार दिला.
मी होकार दिलेला भाईला आवडला नाहीं असं दिसले. तो म्हणाला, "चला हो, आपण बाहेर जाऊं. तिथं चहा वगैरे घेऊ नि पटकन परत येऊं. मला सिगारेटचं पाकीटहि घ्यायचं आहे. चला जाऊं."
" नको ना." दुसरी मुलगी अति लाडिकपणे म्हणाली.
"चला हो, जाऊं दोन मिनिटाचं काम."
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .