टम्म हें गांव युद्धांत उध्वस्त झालें असल्याने एखाद्या जुजबी बाजारहाट किंवा प्रदर्शनासारखें, बांबू, कांठ्या, लांकडे, तंबू यांचेच आडोसे, झोपड्या, दुकानें यांनी वसलेलें होतें. टम्मूस एका पहाडी जातीच्या तरुण लेफ्टनंटकडून आम्हीं पास मिळवला. शर्मा नांवाचे एक मणिपुरी गृहस्थ तेथें हॉटेल चालवीत. त्यांच्या मित्राचा एक ट्रक माल भरून इंफाल गांवी जाणार होता. त्यांत त्यानें आम्हांला न्यायचें कबूल केलें. आम्हांला वाटलें फुकट नेतोय्. दुपारी दोन वाजतां आम्ही निघालों. वाटेंत अनेक ठिकाणीं पास दाखवावे लागले. रात्री आठ वाजतां पलेल गांवीं पोंचलों.येथून इंफाल १३ मैल होतें.येथवर सुभाषचंद्रांचा स्वातंत्र्यध्वज विजयावर विजय मिळवीत फडकला होता.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .