दोन्ही घोडी पाण्यांत शिरलीं नि गुडघाभर पाण्यांत थांबली. त्यांनी माना खाली केल्या नि पाण्यांतून बुडबुड आवाज आले. घोड्याच्या मानेचा उतार झाला होता. घसरगुंडीवर पहिल्यांदा चढून बसलेल्या मुलासारखी राजूला भीति वाटली. त्यानं आयाळ गच्च धरून ठेवली. भ्यालेल्या मांजराच्या पिल्लासारखा तो तिथूनच नदीत पाहूं लागला. घोड्याचं प्रतिबिंब हलत्या पाण्यांत थरथरत होतं. पाण्याचा प्रवाह पायांखालून वाहत होता. त्याकडे पाहतां पाहतां आपणच घोड्यासह वाहत जात आहोत असं वाटत होतं. पिणं थांबवून घोड्यानं मध्येच वर मान केली, नि तें फुरफुरलं. रंगीत तुषारांचा पडदा राजूच्या डोळ्यांसमोर नाचला नि मंद गतीनं पाण्याकडे उतरूं लागला.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .