पु. ग.सहस्रबुद्धे :- भारताच्या राष्ट्रीय प्रकृतीचे चिकित्सक


अंक :– वसंत ; वर्ष :– जुलै १९६४

गेल्या शंभर वर्षांत महाराष्ट्रात चिपळूणकर, आगरकर, टिळक, लोकहितवादी, काळकर्ते परांजपे, महात्मा फुले, प्रा. माटे, डॉ. आंबेडकर यासारख्या विचारवंत कर्तृत्ववान पुरुषांची एक परंपराच होऊन गेली. प्रत्येकाने काळाच्या मागणीनुसार निरनिराळ्या क्षेत्रात प्रचंड असे कार्य करून समाजाला मार्गदर्शन केले आहे, समाजसेवा केली आहे. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून बाहेर पडण्याची तळमळ त्यांच्या ठिकाणी प्रकर्षाने दिसून येत होती. भारताला जगात मानाचं स्थान मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या सर्व शक्ती पणाला लावल्या. समाजातले दोष नाहीसे करून त्याला तेजस्वी व कर्तबगार बनविण्यासाठी या साऱ्या महाभागांनी अक्षरशः सतीचे वाण हाती घेतले होते. याच पराक्रमी पुरुषांच्या मालिकेत आज महाराष्ट्राला वैचारिक मार्गदर्शन करणारे डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे यांचे स्थान आहे. आजच्या राजकीय बजबजपुरीत समाज कोणत्या दिशेने वहावत चालला आहे, त्याची दिशा प्रयत्नपूर्वक बदलणे किती आवश्यक आहे याविषयी तर्कशुद्ध विचारसरणी व आंतरिक तळमळ हा डॉ. सहस्रबुद्धे यांच्या लिखाणाचा स्थायी भाव आहे. अंक :– वसंत ; वर्ष :– जुलै १९६४ गेली तीस पस्तीस वर्षे याच कार्यासाठी आपली लेखणी व वाणी ते सतत झिजवीत आहेत. समाज अंधश्रद्ध राहू नये, त्याने विज्ञानाच्या प्रकाशांत सत्यशोधन कठोरपणे करून विचारपूर्वक आपला मार्ग प्रगतीच्या दिशेने आखावा म्हणून विविध व्यासपीठांवरून त्यांनी महाराष्ट्रात प्रचंड ज्ञानसत्र चालविले आहे. कोणत्याही विषयाचा अतिशय सूक्ष्म पद्धतीने सांगोपांग अभ्यास करून वाचकांच्या मनावर तो विषय ठामपणे बिंबविण्याची कला डॉ. साहेबांना उत्तम साधली आहे. 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


वसंत , व्यक्ती विशेष
व्यक्ती विशेष

प्रतिक्रिया

  1. Mukund Deshpande

      3 वर्षांपूर्वी

    परखड,

  2. Harihar sarang

      3 वर्षांपूर्वी

    राष्ट्र म्हणजे केवळ जमिनीचा तुकडा नव्हे हे जेवढे खरे आहे तेवढेच ते केवळ राष्ट्रीय अहंकारावरही आधारलेले नाही। राष्ट्र म्हणजे इथली बहुसंख्य जनता, खेड्यापाड्यांत अन् दऱ्याखोऱ्यांत राहणारी। त्यांनी कोणता अहंकार बाळगावा? या सामान्यांच्या एकसमान हितासंबंधांवर आधारित राष्ट्रबांधणीची गरज होती। हे फक्त महात्मा गांधींनी ओळखले होते। डॉक्टर साहेब या महान आत्म्याबाबतीत कधीच फारसे अनुकूल नव्हते। आणि ते स्वाभाविकही होते। त्यांची विशिष्ट विचारसरणी त्याचे द्योतक आहे।

  3. Chandrakant Chandratre

      3 वर्षांपूर्वी

    सहस्त्रबुध्दे साहेबांनी तत्कालीन केलेल्या टिपणात आज पर्यंत कोणताही फरक पडलेली नाही. त्यांचे मुळ लिखान सर्वांपर्यंत पोहोचल पाहीजे.

  4. किरण भिडे

      7 वर्षांपूर्वी

    पुढच्याच महिन्यात त्यांचा एक लेख आपण देत आहोत...'आपली फौजदारनिष्ठा', नक्की वाचा. त्याआधी त्यांचा परिचय व्हावा सगळ्यांना म्हणून हा लेख.

  5. mugdhabhide

      7 वर्षांपूर्वी

    डॉ . सहस्रबुद्धे yani kahakashawar lekh lihile yacha aadhava wachanyapeksha tyancha lekhach wachayla milala tar jast changale hoil.

  6. kamatgirish

      7 वर्षांपूर्वी

    पुनश्च समर्पक योग्य वेळी

  7. CDKavathekar

      7 वर्षांपूर्वी

    अत्यंत सुंदर, पु ग चे मी माझे चिंतन नावाचे एक पुस्तक 4 वर्षपूर्वी वाचल्याची आठवण झाली. त्यांचे वेगवेगळ्या विषायावरील लेख या app वर वाचायला आवडेल

  8. mohinipitke

      7 वर्षांपूर्वी

    अतिशय अमूल्य

  9. mohinipitke

      7 वर्षांपूर्वी

    आजच्या समाजात चंगळवादाचे थैमान चालू आहे . आत्मकेंद्री प्रवृत्ती वाढीस लागली आहे . विवेक बोथट झाला आहे . महाराष्ट्राची वैचारिक परंपरा खंडित झाली आहे . कारण विचारशीलतेसाठी काही विशिष्ट गुणांची आवश्यकता असते . त्यांचा अभाव आहे . बौद्धिक खोली, तर्कसुसंगतता, परमत आदर , सहिष्णुता आणि दृष्टीकोनची विशालता आज उरलेली नाही . डॉ . सहस्रबुद्धे अशा ज्येष्ठ, श्रेष्ठ विचारवंतांचे अग्रणी होते .



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen