ज्या वयांत कावळ्यांसारख्या कुरूप प्राण्यांचा द्वेष करावा, गलोल घेऊन त्यांच्यातल्या एखाद्याला जखमी करून उफराटे बांधून टाकावे, आणि गंमत पाहावी असे सर्वसामान्य माणसांना वाटते, त्या वयात माझे कावळ्यांशी जन्माचे नाते जडले. इंग्रजी पाचवीत शिकणाऱ्या मुलाचे असावे तेवढे माझे वय असताना आई वारली. घरात दोन बहिणी तेवढ्या. एक मोठी नि एक धाकटी. याशिवाय वडीलधारे माणूस नाही. आईच्या मरणाचे डोंगराएवढे दुःख गळ्यात बांधून शेजारपाजारच्या जाणत्या लोकांनी मला आईच्या उत्तरक्रियेला बसवले. सातव्या दिवसापासून रोज विधी सुरू झाले. भटजी आधीच उशिरा येत. सारी तयारी करून त्यांची वाट बघत बसावे लागे. गावाबाहेर तळ्याच्या काठावर तीन तीन तास उत्तररक्रिया चाले,नि घरी परतायला दुपारचे दोन वाजत. सकाळी फक्त वाटीभर पेज तेवढी खोबऱ्याच्या तुकड्याबरोबर पोटात ढकललेली असे. त्यामुळे घरी परतेपर्यंत झीट जाण्याएवढी भूक लागे. कोवळ्या वयातली ती भूक आवरता आवरत नसे. पण भाबड्या मनाला वाटायचे, आईच्या आत्म्याला शांति लाभण्यासाठीहा देहदंड निमूटपणे सोसला पाहिजे. या एका भावनेच्या बळावर सारे निभावून नेत होतो. पिंड द्यायच्या दिवशी मात्र कहर झाला.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Ashwini Sathe-Ghangrekar
4 वर्षांपूर्वीअजूनही कावळ्यांवर काही लेखन असेल तर वाचायला आवडेल. हे लिखाण तर एक्दम सुंदर आहे.
anita thakur
4 वर्षांपूर्वीसुंदर लेख. किती बारीक निरीक्षण.
Anant Tadwalkar
4 वर्षांपूर्वीसुंदर!
Prabha Salwekar
7 वर्षांपूर्वीअप्रतिम लेख. आता स्वयंपाक करतांना खिडकीतून कावळा दिसला की लेख आठवेल
किरण भिडे
7 वर्षांपूर्वीदिलंय की...मधु मंगेश कर्णिक. पहा बरं...
31medha
7 वर्षांपूर्वीलेखकाचे नाव का दिलेले नाही?
HemantLatkar
7 वर्षांपूर्वीछान. मुंबई येथील सायन रुग्णालय परिसरात झाडांवर कावळे भरपूर आहेत.
Shubhada
7 वर्षांपूर्वी✍?
अमोगसिद्ध
7 वर्षांपूर्वीआॅरवेलची जीवनकहाणी भन्नाट. .. धन्यवाद!
Abhijit
7 वर्षांपूर्वीखुप सुंदर. वाचताना लक्ष एकाग्र झाले होते.
Vivek
7 वर्षांपूर्वीखूप आवडला
akashvthele
7 वर्षांपूर्वीएवढा जुना लेख पण अजूनही अगदी ताजा वाटतोय! आजच्या परिस्थितीलाही लागू होईल!
Parvani
7 वर्षांपूर्वीछान
bookworm
7 वर्षांपूर्वीलेख अगोदर कुठेतरी वाचल्यासारखा वाटतोय, पण मस्त वाचनानंद!
Vilaseksambekar
7 वर्षांपूर्वीसुंदर
shailendravaidya
7 वर्षांपूर्वीअप्रतिम!