fbpx
☏ 91 5225 5235 | 9833 848 849

सामना

मांजरीचं एक वैशिष्ट्य सांगितलं जातं. जेव्हा कुणी तिच्या मागे लागतं त्यावेळी ती सुसाट पळते. जीव वाचवायचा आटोकाट प्रयत्न करते. मात्र ज्या क्षणी तिचे सुटण्याचे सगळे रस्ते बंद होतात….. त्यावेळी ती पलटून समोरच्यावर हल्ला करते. अशाच एका मांजरीची कथा लिहिली आहे मुक्ता मनोहर यांनी जून १९७९ च्या ‘स्त्री’ मासिकात. जिचं नाव आहे ‘ सामना ‘.

————००————

अंक:- स्त्री ;  वर्ष :- जून १९७९

दुपारचे चार वाजून गेलेले असतात. पाच-सहा पत्रं अजून टाइप करून व्हायची असतात. एक जांभई दीर्घकाळ तोंडात रेंगाळते. पाच-दहा मिनिटं टाइपराइटरवर डोकं टेकून झोपावसं वाटतं. ही साधी इच्छा आवरणं अगदी भाग असतं. मी असं बेशिस्तपणे पाच मिनिटं विसावण्यामुळं काहीही घडू शकतं; म्हणजे अगदी माझी नोकरीसुद्धा फूss होऊ शकते. खरंच असं घडलं तर? मुक्त जीवनाच्या गोड कल्पनेभोवती मन रेंगाळतं; पण जीवन कुठं मुक्त आहे? आई-बाबांच्या डोळ्यांतली ती माझ्या लग्नाची काळजी? ‘एक सुंदर पिंजऱ्यात अडकलेली मी एक चिमणी-’ असं काहीतरी मनात तरंगून जातं. मी नोकरी करणारी एक तरुणी.

खरंच, या तरुणपणाचा हिशोब मांडावा का, असा प्रश्र्न नजरेसमोर तरळतो; आणि अचानक त्या प्रश्नाचे शब्द विस्कटून जातात. एक बोथट चेहरा तिथं आकार घेतो. माझी तंद्री नष्ट होते. गोपालन माझ्या टेबलासमोर उभा असतो. माझ्या कपाळावर एक आठी उमटते. तो समोर उभा आहे. याकडं मला पूर्ण दुर्लक्ष करायचं असतं. तो आता रोजच्यासारखाच गुरगुर करणार ‘अजून टाइप नाही का झालं मिस्? साला, यहाँ काम करते तीन बरस हो गये। फुकटका पगार खाती है, -’

गोपालन म्हणजे माजलेला कुत्रा आहे.

‘ओबिडियंट डॉग!’ माझे बंद ओठ पुटपुटतात. या कंपनीचे डायरेक्टर सेठ बाबूलालजी दमानिया यांचा तो सर्वात इमानदार कुत्रा. सेठजीचे पाय चाटणं, इतरांवर गुरगुरणं, वेळ पडल्यास अगदी जोरात भुंकणं हेच त्याचं काम.

एव्हाना त्याचे गटगटीत डोळे माझ्यावर रोखलेले असतात. यथाशक्ती त्याचा अपमान करण्याचा माझा प्रयत्न असतो. मी काम पूर्ण करण्याच्या इराद्यानं टाइपरायटर वाजवायला सुरुवात करते. माझ्या टाइपरायटरचा बार तो हातानं थांबवतो. माझं टाइपिंग थांबतं. त्याच्या अस्तित्वाची दखल घेणं आता भाग असतं. जास्तीत जास्त अलिप्तपणे मी त्याच्याकडे बघते. माझा अलिप्तपणा तो सहज चिरडून टाकतो.

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

This Post Has 6 Comments

 1. कथा चांगली अाहे. अावडली. लेखकाला शेवटाकडे सूचकता वाढवता अाली असती.
  कथेला प्रस्तावना नसावी. इथे सुरूवातीला लिहिलेली काही वाक्ये कथेबद्दल वेगळीच अपेक्षा तयार करतात, त्यामुळे कथा चांगली असतानाही तिचा नेमका परिणाम होत नाही.
  कथेत फोटो वापरू नये. कथेचा मूळ अनुभव किंवा परिणाम (जो व्यक्तीसापेक्ष अाहे) अाणखी वरच्या पातळीला नेतील असे फोटो (रेखाचित्र) निर्माण करणे अवघड असते. इंटरनेटवर मिळणारे फोटो कटाक्षाने टाळावेत.

 2. Khup chhan?

 3. गोष्टीच्या सुरुवातीला मांजराचा उल्लेख आहे. लेखिकेचे ‘परवानगी नसताना दोन दिवस सुट्टी घेणं’, हे मांजराच्या ‘पलटून हल्ला करणे’ ह्या गुणाशी साम्य दाखवायचे आहे का? तसे असेल तर फारसा दम नाही असं म्हणावं लागेल.

 4. वाह! एकदम आवडली.

 5. ही कथा आज ‘पुनश्च’साठी निवडण्याचं कारण काय हे विचारावंसं वाटतं.
  मंगेश नाबर

  1. पुनश्च बद्दल ‘हे खूप जड, वैचारिक साहित्य देतात’ हा समज दृढ होण्याआधी काहीतरी हलकं ( पचायला, दर्जाने नाही ), मनोरंजनपर साहित्य द्यावे म्हणून महिन्याभरात एखादी कथा किंवा विनोदी लेख द्यावा असं ठरवलंय. मुक्ता मनोहर यांची आजची कथा मला शब्दांचा छान खेळ वाटली म्हणून दिली. टीकात्मक काही लिहा ना त्या कथेवर, त्याचे स्वागत आहे.

Leave a Reply

Close Menu