आंब्याचे दिवस पुन्हा. . .


वसंतागमनाची चाहूल सृष्टीच्या बदलात दिसायला लागते. त्याला कॅलेन्डर बघायची गरज नसते. हा बदल पत्र, पुष्प, फल यांच्या गंध रंगातून देखील जाणवायला लागतो. त्यातलाच एक गंध असतो आंब्याचा- आम्रफळाचा. जो वेडावून टाकतो... भले हल्ली बारोमास आंब्याचा रस उपलब्ध असतो. पण त्याला प्रत्यक्ष आम्रफलाच्या रंग स्वादाची सर अजून तरी नाही. पुढचं कोणी सांगावं? पण तोपर्यंत आंबा तो आंबाच. इथे हे पण सांगायला हवे की आंबा म्हटलं की केवळ हापूस नाही तर केसर, बदाम, तोतापुरी ते थेट रायवळ आंब्यापर्यंत जे शे-दीडशे प्रकार आहेत ते सर्व येतात. तर ही आम्रप्रशस्ती पूर्वापार चालत आलेली आहे. म्हणून तर आंब्याच्या मोहोराला वसंताचे अग्रपुष्प म्हटलं आहे. काही ठिकाणी हा मोहोर खाण्याचा विधी आहे. त्याला साजेसे नाव देखील आहे- आम्रपुष्प भक्षण! त्यानंतर छोट्या छोट्या कैऱ्या येतात त्याला बाळ कैरी म्हणतात. त्याला लगडूनच मग कैऱ्याचा घोस आणि वाढतं ऊन यायला लागतं आणि मग एक दिवस ह्या कैऱ्यावर सूक्ष्म पिवळसर झाक यायला लागते आणि आता आंब्याची आढी लावायला सुरुवात होते. मग एकदम दिसतो ते सुकुमार पिकलेला आंबा! हे आम्रकौतुक जिथे जिथे म्हणून आंबा पिकतो तिथे तिथे दिसतं. बांगलादेशचा राष्ट्रीय वृक्ष आंबा आहे तर पाकिस्तानात आंब्याला ‘शान-ए-खुदा’ असंही म्हणतात. पण ह्या सर्वात बहार आणली आहे ती आपल्या रामदासस्वामींनी. त्यांना आंब्याचे अप्रुप वाटणं साहजिकच आहे कारण हा एक असा संतमाणूस आहे ज्याने ऐहिक गोष्टीत पुरेपूर स्वत: रस घेतलाच पण ते इतरांना पण शिकवलं. त्यांनी म्हटलंय-  सौजन

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


प्रासंगिक , ललित , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रिया

 1. Rdesai

    3 वर्षांपूर्वी

  सुंदर वर्णन .

 2. bookworm

    4 वर्षांपूर्वी

  आम्रयोग!....क्या बात है!??विंदा लाजबाब!

 3. vasantdeshpande

    4 वर्षांपूर्वी

  ठीक.

 4. Shubhada Bodas

    4 वर्षांपूर्वी

  विंदाचा लेख अप्रतिमच! आता देवगडमध्ये तऱ्हे तर्हेचे आंबे खाल्ले तरी देवगड हापुसला तोड नाही.

 5. smanisha

    4 वर्षांपूर्वी

  Surekh lekh junya athavani jagya zhalya lahanpanichya

 6. Ambarish Kulkarni

    4 वर्षांपूर्वी

  आंब्यासारखाच सुमधुर लेख!

 7. CHARUDATTA SHRIDHAR SHENDE

    4 वर्षांपूर्वी

  VINDA mhanje VINDHACH ! kiti sahaj, sundar shabdat sampurna chitra dolysamor ubhe kele ahe . APRATIMN !!!!वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen