fbpx
☏ 91 5225 5235 | 9833 848 849

आडनावं-प्रिय-अप्रिय

माणूस लक्षात ठेवावा कसा? बहुधा या प्राथमिक गरजेतून नावं आली आणि मग कुटुंब व्यवस्था जन्माला येऊन विस्तारत गेली तशी हळूहळू हा त्याचा मुलगा, तो याचा मुलगा म्हणून जोडनावं आली. त्यानंही गरज भागेना म्हणून प्रत्येक कुटुंबासाठीचं विशेषनाम म्हणून बहुधा आडनावं जन्माला आली. ती कशी पडली असावीत या प्रश्नातून या लेखाचा जन्म झाला. सामाजिक इतिहासात अत्यंत मनापासून रस असलेल्या अरुण टिकेकर यांनी तो तसाच रसभरीत लिहिलाही..

********

काही आडनावांच्या बाबतीत मला नेहमीच कुतूहलजन्य आश्र्चर्य वाटत आलं आहे. ही अशी आडनावं कोणी अन् का ‘ठेवली’ असतील, कुणाला अन् का ती ‘मिळाली’ असतील, त्यांनी ती का स्वीकारली असतील, सारंच कोड्याप्रमाणं वाटतं. महाविद्यालयीन जीवनात एकदा आमचा क्रिकेटचा संघ किर्लोस्करवाडीला सामना खेळायला गेला होता. दोन्ही संघ समोरासमोर उभे करून तिथले महाव्यवस्थापक गुणे अन् संचालक चिमणराव किर्लोस्कर खेळाडूंच्या ओळखी करून घेत होते. तेव्हा ध्यानात आलं की, त्यांच्या संघाच्या ‘ओपनिंग बॉलर’चे आडनावच मुळी ‘हातमोडे’ होतं. मनात आलं, दुसऱ्या बोलरचं आडनाव ‘डोईफोडे’ तर नसावं ?

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

This Post Has 10 Comments

 1. राजेश्री डोईफोडे
  मस्त वाटलं लेख वाचून मज्जा वाटली कारण आमचे आडनाव ही काहीस गमतीशीर च आहे. मला ही प्रश्न पडाय चा ही आडनाव कोणी बनवली असतील

 2. खूप छान लेख..आडनावांची यादी तशी न संपणारीच. शेंबडे, नाळे, टकले, बोडके इ. व्यंगात्मक आडनावांबरोबरच पारधी समाजात तर ‘नामकरण’ वगैरे विधी होतच नाहीत. बाळ जन्माला आल्या आल्या तत्कालीन घडत असलेल्या घटनांवरुन बाळाला पुकारायल्या सुरुवात करतात. उदा. डोक्यावरुन विमान जात असेल तर “इमान्या” वगैरे वगैरे….

 3. सुंदर लेख

 4. खूप छान लेख , मस्त माहिती

 5. mast lekh kharach maja ali

 6. बापट कसे आले असेल ? हा आञ दिवसभर भुंगा

 7. सोडावाॅटर बाॅटल ओपनरवाला….आडनावांच्या धम्माल गमतीजमती वाचून मजा आली.

 8. मस्त माहिती

  1. किर्लोस्करवाडीला महाविद्यालय कधी सुरू झाले?

 9. अतिशय वाचनीय आणि रोचक लेख.

Leave a Reply

Close Menu