X X X फुल्या फुल्यांचे पुस्तक

पुनश्च    मधुकर वकील    2018-07-02 19:00:48   

सकल मराठी विश्वात ज्यांची चर्चा होत असते अश्या त्या पुणेरी पाट्या. मात्र या नमुनेदार आणि विक्षिप्त ' पाट्यांचे जनक ' असे ज्यांना म्हणता येईल ते पुण्याचे माजी महापौर श्री. प्र. बा. जोग यांच्याबद्दल हल्ली फार कमी जणांना माहिती असते. अतिशय तऱ्हेवाईक वल्ली असलेले जोग हे त्यांच्या भांडणांसाठी सुप्रसिद्ध होते. पुढच्या काळात तर त्यांनी ' मी असा भांडतो' या नावाचे पुस्तकच लिहिले. त्याच पुस्तकाचे परीक्षण/ समीक्षण करणारा लेख १९६५ सालीच्या ' माणूस' अंकात आला होता. मधुकर वकील यांनी लिहिलेला तो लेख आज वाचा अवांतर सदरात-  ******** असे ज्यांना आफतमे उलझनमे जंजालमे बेहोष है पूरा वह मर्द है कि जो हर हालतमे खूष है।। “मी असा भांडतो” हे प्रसिद्ध पुणेरी उपमहापौर श्री. प्र. बा. जोग यांचे पुस्तक ‘असाच मर्दाचा पोवाडा’ आहे, असा निर्वाळा नासिकस्थ कवी श्री. सोपानदेव चौधरी यांनी दिला आहे. भांडणे अंगावर घेणारा माणूस काही प्रमाणात तरी मर्द असावाच लागतो. (अपवाद आपले पंतप्रधान शास्त्री व संरक्षणमंत्री चव्हाण. कारण हे दोघे ‘मर्द’ असूनही भारताच्या शत्रूंशी असलेली भांडणे थोड्या गोडीने व बऱ्याच नेहरू-गुलाबीने मिटवू पाहातात.) केवळ पृष्ठसंख्येच्या मर्यादेमुळे श्री. प्र. बा. जोग यांनी आपली सर्व १३०५ भांडणे सविस्तर दिली नाहीत. नाहीतर पृष्ठसंख्येतही हा एक अजोड ग्रंथ झाला असता. सॉलिड शिव्यांचा स्टॉक हा ग्रंथ आहे त्या कृश स्वरूपातही अत्यंत वाचनीय आहे. हा ग्रंथ वाचून पुण्यासंबंधी असलेले इतरांचे वाईट मत पुण्याला इरसाल शिव्यांची लाखोली देण्यापर्यंत घसरेल. वस्तुतः अशांची सोय करणयाकरता मराठीतील सर्व शिव्यांचे एकाक्षरी ते चौदा-पंधरा अक्षरी परिशिष्ठ या ग्रंथाला लेखकाने जोडायला हवे होते.कारण श ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


प्र. बा. जोग , मधुकर वकील , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रिया

  1. Alka

      7 वर्षांपूर्वी

    पुस्तकं कुठे मिळेल.

  2. Kulkarnivaibhav

      7 वर्षांपूर्वी

    मस्त लेखन आहे

  3. Sanap

      7 वर्षांपूर्वी

    Khu छान

  4. B.M. pawar

      7 वर्षांपूर्वी

    Hkupach Chan

  5. asmitaph

      7 वर्षांपूर्वी

    छानच लेख

  6. shubhadabodas

      7 वर्षांपूर्वी

    हे वाचून जोगसाहेबांची मूर्ती समोर उभी राहिली. ते आमच्या गल्लीतले(पुणेरी शब्द).त्यांच्या घरावर पाटी होती - आम्ही कोणतेही काम करतो,त्यात अंत्ययात्रेचा पण समावेश होता. अफलातून व्यक्तिमत्व!

  7. Makarand

      7 वर्षांपूर्वी

    हे पुस्तक बाजारात उपलब्ध आहे का ? मूळातच वाचायला हवे

  8. सुरेश जोहारी

      7 वर्षांपूर्वी

    प्र.बा.जोग यांचे विषयी हे नवीन पैलू कळाले. पुस्तक वाचायला हवे. धन्यवाद

  9. Aaidada

      7 वर्षांपूर्वी

    मी एकारान्त सदाशिव पेठी कोकणस्थ पुणेकर आहे ?? प्र बा जोग ह्यांच्या बद्दल ऐकले होते पण पुस्तका बद्दल माहिती नव्हती. वाचायला हवे

  10. ajitpatankar

      7 वर्षांपूर्वी

    प्र.बा. जोग हे एक अफलातून व्यक्तिमत्त्व होते.. खूप वर्षांपुर्वी दूरदर्शनवर त्यांची मुलाखत पाहिल्याचे स्मरते.. त्यांचे “खुल्लम खुल्ला” नावाचे देखील पुस्तक होते. गिरगावातील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय येथे ही दोन्ही पुस्तके होती.. मी वाचली आहेत.. दादर सार्वजनिक वाचनालयात देखील ही पुस्तके असल्याचे दादरच्या एका मित्राने त्यावेळी सांगितले होते.. त्यांचा एक किस्सा गमतीशीर आहे.. पुण्यात कुठलातरी क्रिकेटचा सामना होता. यांना त्याचे समालोचन करायचे होते.. परंतु आकाशवाणीने परवानगी नाकारली.. तेव्हा यांनी नेहेरू स्टेडियमच्या बाहेरील एका झाडावर मचाण बांधून समालोचन केले होते...

  11. drulhas

      7 वर्षांपूर्वी

    LaaJawab!

  12. yeshwant

      7 वर्षांपूर्वी

    फक्त ट्रेलर वाटला. फक्त चव चाखवून भूक चाळवू नका हो प्लिज.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen