ऐंशीच्या उंबरठ्यावर

पुनश्च    वि. द. घाटे    2018-10-06 06:00:28   

दिवाळी अंक १९७२ लेखाबद्दल थोडेसे : विठ्ठल दत्तात्रय घाटे (१८९५ ते १९७८) हे मराठी ललित लेखनातील एक अव्वल नाव. अंतर्मुख करणारे, मात्र प्रसन्न आणि मिश्किल लिखाणासाठी सुपरिचित असलेले ते चिंतनशील लेखक होते.  कवी आणि शिक्षणतज्ज्ञ म्हणूनही त्यांची ओळख होती. त्यांचे वडिल कवी दत्त यांच्याकडून हा साहित्याचा वारसा आलेला होता. प्रसिद्ध रविकिरण मंडळाचे ते सदस्य होते. 'नाना देशातील नाना लोक', 'काही म्हातारे एक म्हातारी', 'पांढरे केस हिरवी मने', ही त्यांची गाजलेली पुस्तके. 'नवलाख दिवे हे तुझ्या घरी' ही त्यांची कविताही खूप वाखाणली गेली. शिक्षकांची वेतनश्रेणी ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या द्विसदस्यीय समितीत ते होते. तक्रारीचा सूर नसलेले, सकारात्मक लिखाण हे त्यांचे खास वैशिष्ट्य. प्रस्तुत लेख लिहिला तेव्हा ते ऐंशीच्या उंबरठ्यावर होते. साधारणः त्या वयात अनेकांचा निराशेचा सूर असतो. अमुक करायचे राहून गेले, तमुकचे श्रेय मला मिळाले नाही, अशा तक्रारी असतात किंवा आता सगळेच कसे उथळ झालेले आहे, असा तरी सूर असतो. घाटे यांनी लिहिलेल्या या लेखात मात्र त्यांनी आपला आयुष्यभराचा सकारात्मक, मिश्कील सूर साधतच 'संध्याछाया रिझविती ह्रदया' असा भाव प्रकट केला आहे. कातर आणि त्याचवेळी अंतर्मुख करणारा हा लेख- ********** ऐंशीच्या दारापाशी पोहोचलो आहे. आता दोनच पावले टाकायची, की उंबऱ्यावर उभा राहीन. पावले दोनच, पण ती वामनाची नाहीत. एका कुरकुरत्या देहाची आहेत व ती पडतील, कदाचित थोडी आणखी पडतील, विश्वास वाटतो. अजून जावेसे वाटत नाही. हा आजवरचा प्रवास कण्हत-कुंथत केला नाही; हसत आणि हसवीतच केला. पण क्वचित कधी हसणे नाटकी होते. कधी शिष्टाचारासाठी असे. या ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चिंतन , अनुभव कथन

प्रतिक्रिया

  1. AKrtns

      6 वर्षांपूर्वी

    सुंदर

  2. hpkher

      6 वर्षांपूर्वी

    अतिशय प्रांजळ लेखन, माझ्या वडिलांचे आवडते लेखक होते. ही पुस्तके मी जवळजवळ 30- 35 वर्षांपूर्वी वाचली होती. धन्यवाद.

  3. deepa_ajay

      6 वर्षांपूर्वी

    श्री किरण भिडे नवयुग वाचन माला क्रमशः प्रसिद्ध करा माझ्यामते एवढी सुंदर मराठी क्रमिक पुस्तक पुनः होणे नाही ह्याचा उपयोग पुढील पिढीतील मुलांसाठी चांगला होऊ शकेल

  4. purnanand

      6 वर्षांपूर्वी

    खूप छान लेख निवडला आहे.सेहेचाळीस वर्षापूर्वीचा असला तरी अगदी ताजातवाना नुकताच लिहिलाय असे वाटते.तितकाच हृद्य पण आहे. इस्वराविषयी चे व्यक्त झालेले विचार ,विचार करण्यासारखे आहेत. खूपच चांगला ;लेख दिलात .धन्यवाद.

  5. sureshjohari

      6 वर्षांपूर्वी

    अप्रतिम लेख

  6. adityabapat

      6 वर्षांपूर्वी

    खूपच छान लेख 'पुनश्च' मुळे वाचायला मिळाला. धन्यवाद ! मला आजवर वि. द. घाटे यांच्या लेखनाची / पुस्तकांची माहिती नव्हती. हा लेख वाचल्यावर वि. द. घाटे यांची पुस्तके वाचण्याची इच्छा निर्माण झाली. काही वर्षांपूर्वी वाचलेल्या एका लेखात वि. द. घाटेंचा उल्लेख आला होता (आता त्या लेखाचा संदर्भ निश्चित आठवत नाही पण), त्यात "वि. द. घाटे हे मराठी साहित्य संमेलनाचे पहिले ब्राह्मणेतर अध्यक्ष होते (१९५३ च्या अहमदाबाद येथील मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष)" असं वाचल्याचं आठवतंय. पुण्यात 'रुपाली' हॉटेल समोरच्या गल्लीत, अर्थात BMCC College च्या गल्लीत, 'गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पोलिटीक्स & इकॉनोमिक्स' च्या अलीकडे आणि 'थीऑसोफिकल सोसायटी'च्या शेजारच्या इमारतीवर "प्रसिद्ध साहित्यिक वि. द. घाटे येथे राहत होते" असा 'नीलफलक' पुणे महापालिकेने वि. द. घाटे यांच्या गौरवार्थ बसवला आहे.

  7. sudhakar

      6 वर्षांपूर्वी

    hoy, to paath me suddha abhyasala aahe. 8th kinva 9th la aasava. Shri ghate ajun hayat aahet he aikun aanand zala. tyanche likhan nehmich manala sparshun jate. Tyanche gambhir prakrutiche ani sakas lekhan nehmi manala aanand dete.

  8. drvyankatesh

      6 वर्षांपूर्वी

    सुधन्वा आणि चान्गल सकस साहीत्य ऊपलब्ध करून देता हे खूपच छान आहे पुनश्चची सभासद संख्या वाढायला पाहीजे

  9. Mrudula

      6 वर्षांपूर्वी

    " मी एक सुसंस्कृत माणूस आहे " असं आत्मविश्वासपूर्वक ठासून सांगणारे आदरणीय वि. द. घाटे प्रत्यक्षात एक अत्यंत प्रसन्न आणि दिलखुलास माणूस होते. माझ्या भाग्याने त्यांना भेटण्याचा दोनदा योग आला आणि त्यांच्या दर्शनानेच मी भारावून गेले. एक तर आम्हाला अभ्यासक्रमात असणाऱ्या नवयुग वाचनमालेचे लेखक-संपादक म्हणून त्यांच्याविषयी आदर आणि कुतूहल होतेच, शिवाय त्यांच्या जवळजवळ सर्व पुस्तकांची पारायणं करून झालेली होती. प्रत्यक्ष भेटीत त्यांनी अतिशय आस्थेने माझी, माझ्या कुटुंबीयांची चौकशी केल्यावर लक्षात आलं की माझ्या पितामहांचा आणि माझ्या वडिलांचा त्यांचा जवळून संबंध आलेला होता. त्यामुळे आपुलकी अधिकच वाढली. त्यांची भेट ही माझ्या आयुष्यातल्या मौलिक आठवणींच्या ठेव्यातली एक आहे. आजचा लेख वाचून त्या आठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद!

  10. shashi50

      6 वर्षांपूर्वी

    खूपच छान पण सुधनवा म्हणाला तस विशिष्ट वयोगटातल्या लोकांना तो जास्त भावेल ! पु.ल.नी जर गंभिर लिखाण केले असते तर ते असेच लिहिले गेले असते !!

  11. [email protected]

      6 वर्षांपूर्वी

    अप्रतिम. वि. द. घाट्यांचा लेख टाकल्याबद्दल खूप आभार.

  12. Aashokain

      6 वर्षांपूर्वी

    अप्रतीम लेख! वयाच्या या वळणावर, जीवनाकडे मोकळ्या मनाने, तृप्त पणे तटस्थपणे पाहणारा. जीवनाबद्दल कुतुहल आहे अभिनिवेष नाही अशा दृष्टीकोनातून पाहणारा हा लेख. वाचकाला वेगळी दृष्टी देऊन जातो. संपादक महोदय आभार..

  13. krmrkr

      6 वर्षांपूर्वी

    कॕशिया भरारला या नावाचा घाटे यांनी लिहलेला एक धडा लहानपणी अभ्यासात होतो. सोपी , प्रवाही भाषा, कुठलाही आक्रस्ताळी आवेश नसलेले लिखाण , मला आवडले. जवळपास आठ दशके जगून झाल्यावर त्या जगण्यावर इतके रसरशीत प्रेम करता येणे तसे भाग्याचे...

  14. Suchitabordekar

      6 वर्षांपूर्वी

    सुंदर

  15. mandarphadke

      6 वर्षांपूर्वी

    अप्रतिम

  16. Meenalogale

      6 वर्षांपूर्वी

    सुंदर लेख.वि द घाटे यांचे दिवस असे होते हे आत्मचरित्रपर पुस्तक खूप पूर्वी वाचल्याचे आठवते.एज्यूकेशन इंस्पेक्टर म्हणून त्यांना आलेले अनुभव वाचनीय आहेत. नवयुग वाचनमालेचे श्रेय बरेचदा फक्त आचार्य अत्रेंना दिले जाते असे मला वाटते.धन्यवाद.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen